संख : भिवर्गी फाटा ता.जत येथे एका दुचाकी वरून जात असलेले महिलेला मागून आलेल्या स्कार्पिओ गाडीने धडक दिल्याने दुचाकी वर असलेली महिला जागीच ठार झाल्याची घटना रविवारी घडली आहे.सावित्री काशीराम वडियर( वय ४०, रा.तिकोंडी) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अधिक माहिती अशी की,जत तालुक्यातील तिकोंडी येथील सावित्री काशीराम वडियर या दि.४ रोजी सायंकाळी संख मधून आपल्या घरी जात असताना भिवर्गी फाटा येथे मागून येणाऱ्या स्कार्पिओ गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सावित्री वडियर या ठार झाल्यामयत सावित्री यांचे पती दोन वर्षांपूर्वी मयत झाले असून यांना एक मुलगा आहे.
धडक होताच स्कार्पिओ चालकांने न थांबता पळवून नेहण्यात आली आहे.घटनेची माहिती मिळताच संखचे पोलीस नाईक आर.एस.बनेन्नवर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.सदर घटनेची नोंद करण्याचे काम उमदी पोलिसांत रात्री उशीरापर्यंत सुरु होते.