संख(रियाज जमादार) : संख (ता.जत) येथील ग्रामपंचायत नळपाणी हे स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरीचे खोली वाढवून पाणी पुरवठा सुरळीत केला असून गावातील ६ वॉटर एटीएमपैंकी ५ कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती संखचे उपसरपंच सुभाष पाटील यांनी दैनिक संकेत टाइम्सशी बोलताना दिली.
सुभाष पाटील म्हणाले,संख ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी पातळी कमी झाली होती,त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता.पाणी पुरवठा विहिरीतील गाळ काढून विहिरीची खुदाई केली आहे.त्यामुळे एक दिवस गाळयुक्त पाणी पुरवठा झाला होता.मात्र दुसऱ्या दिवशीपासून नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून दिले आहे.त्याचबरोबर गावातील ६ वॉटर एटीएम मशीनपैंकी ५ वॉटर एटीएम कार्यान्वित करण्यात आला आहे.त्यामुळे येथून पुढे नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.
सुभाष पाटील म्हणाले,गावातील गटारीचीही स्वच्छता सुरू आहे.पंरतू काहीजणांकडून काम बंद पाडण्यात आले आहे.निवडणूकीतील पराभव जिव्हारी लागल्याने विरोधकाकडून असे उद्योग सुरू आहेत.मात्र कितीही अडचणी आल्यातरही गावांच्या विकासाला आमचे प्राधान्य राहणार आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार फंडातून निलांबिका बसवेश्वर मंदिर सभा मंडप बांधकामासाठी १० लाखाचा निधी प्राप्त झाला आहे.त्याशिवाय अनेक विकास योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत.
विविध योजनासाठी निधीची मागणी केली आहे.विविध विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहे,त्यांचा पाठपुरावा सुरू आहे,गावांच्या विकासासाठी माझे सर्वोत्तरी प्रयत्न करणार असल्याचे सुभाष पाटील यांनी सांगितले.