यमगरवाडीच्या जवानाची जम्मू काश्मीरमध्ये आत्महत्या | आत्महत्येचे कारण अस्पष्ट : उद्या सकाळी होणार अंत्यसंस्कार

0
2
तासगाव : तासगाव तालुक्यातील यमगरवाडी येथील मयूर लक्ष्मण डोंबाळे (वय 23) या भारतीय सैन्यदलातील जवानाने शुक्रवारी रात्री आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे. उद्या (रविवार) सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
तालुक्यातील यमगरवाडी येथील मयूर डोंबाळे हा रत्नागिरीमध्ये झालेल्या भरतीत भारतीय सैन्यदलात रुजू झाला होता. त्याचे पुण्यामध्ये ट्रेनिंग झाले. सध्या तो जम्मू काश्मीरमधील सांबा या जिल्ह्यात कार्यरत होता.
घरची परिस्थिती बेताची असताना मयूर याने सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या घरी आई – वडील, एक मोठा भाऊ व एक बहीण आहे. बहिणीचे लग्न झाले आहे.
दरम्यान, शुक्रवारी रात्री मयूर याने अचानक आत्महत्या केली. मात्र त्याने कोणत्या कारणाने आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत मयूर याच्या कुटुंबियांना माहिती दिली. शुक्रवारी सकाळी त्याचे कुटुंबीय जम्मू काश्मीरला गेले आहे. उत्तरीय तपासणीनंतर मयूरचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
आज (शनिवार) रात्री उशिरापर्यंत मयूरचे कुटुंबीय पुण्यात पोहोचतील. तर उद्या (रविवार) सकाळी ते मूळ गावी यमगरवाडी येथे पोहोचतील. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here