सांगली: जत तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी जत तहसीलदार कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्यावतीने शुक्रवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात करण्यात आले. या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट या घटक पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. जनावरांना चारा-पाणी उपलब्ध करून द्यावे, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करावे आदी मागण्यांसाठी आंदोनलाच्या माध्यमातून करण्यात आलेत.
यावर्षी अवकाळी अगर कोणत्याही प्रकारे पाउस न झाल्याने जत तालुक्यात पिण्याचे पाणी जनावरांचा चारा यांचा प्रश्न अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाला आहे. त्याकरिता शासनाने त्वरित जत तालुक्यातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.अन्यथा जनावरांना घेऊन स्थलांतर करावा लागणार आहे.जत तालुका कायम दुष्काळी व अवर्षण प्रवण क्षेत्रात असल्याने चालू वर्षी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हे प्रश्न शासनास निदर्शनास आणून देणे अत्यंत गरजेचे आहे.चालू वर्षी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी.
खरीप पिक वाया गेल्याने विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी शासनाच्या दुष्काळी संदर्भातील सर्वसवलती देण्यात द्याव्यात तसेच सध्या जत तालुक्यात पाऊस नसला तरी कोयना ,चांदोली धरणक्षेत्रात पाऊस सुरु असल्याने म्हैसाळ योजनेचे आवर्तन जत तालुक्याकरिता सुरु करून जत तालुक्यातील पिण्याच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा.तसेच या आवर्तनाचे बिल टंचाई निधीतून भरणेत यावे.शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याकरिता शासनाकडून थेट अनुदान मिळावे.सध्या गाई,म्हशींच्या दुधाचे दर खूप कमी झाले आहेत.या दुधदरात स्थिरता येणेसाठी शासनाने उपाययोजना कराव्यात.तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
त्यामुळे जत तालुका दुष्काळी जाहीर व्हावा, जनावरांना चारा पाणी उपलब्ध करून द्यावे. म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करावे या प्रमुख मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. जत तहसीलदार कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.विक्रमसिंह सावंत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व बाजार समितीचे संचालक रमेश पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय सावंत यांनी या उपोषणाचे नेतृत्व केले.यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले,यावर्षी अवकाळी अगर कोणत्याही प्रकारे पाउस न झाल्याने जत तालुक्यात पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
त्याकरिता शासनाने त्वरित जत तालुक्यातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अन्यथा जनावरांना घेऊन स्थलांतर करावा लागणार आहे. यासाठीच महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्यावतीने जत तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.सर्व मागण्या लवकरात लवकर मागण्या मान्य करा अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा यावेळी आ.सावंत यांनी दिला.
यावेळी आप्पाराया बिरादार,बाबासाहेब कोडग,सागर पाटील,अमित दुधाळ,सुजय शिंदे, महादेव पाटील,सरदार पाटील,बसवराज बिराजदार,दिनकर पतंगे, रमेश साबळे,मारुती पवार, शिवानंद तंगडी,मारुती पाटील,रामचंद्र सावंत बनाळी, यशवंतराव चव्हाण, संजय शिंदे,सुरेश कोडग, गणी मुल्ला, सुभाष बालगाव, रामचंद्र कोडग, नवनाथ निकम,मारुती कोरे, शोएब नायकवडी,दिनेश जाधव, आकाश बनसोडे, सुमित जगधने, निंगप्पा हिर्गोंड, रमेश कोळेकर, शशांक पुजारी,अनिल पाटील, मौला मनेर, मोहन माने पाटील, अरविंद गडादे, बसवराज पाटील एकुंडी,पांडुरंग वाघमोडे, शिवानंद बिरादार, रायगोंड बिरादार, नंदकुमार सुर्यवंशी आदी मान्यवर नेते मंडळी आणि शेतकरी बंधू यावेळी उपस्थित होते.
जत येथे महाविकास आघाडीच्या आंदोलनावेळी बोलताना आ.विक्रमसिंह सावंत बाजूस उपस्थित मान्यवर