जत : संख (ता. जत) येथे ग्रामन्यायालयाचे ३० जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सारंग कोतवाल व न्यायमूर्ती अभय आहुजा तथा पालक न्यायमूर्ती सांगली जिल्हा यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे.हा सोहळा ग्रामपंचायत कार्यालय येथे होणार आहे,अशी माहिती जत तालुका वकील संघटना असोसिएशनचे अध्यक्ष अँड. शिवशंकर खटावे यांनी दिली.
या कार्यक्रमास बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे माजी अध्यक्ष मिलिंद थोबडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा प्रमुख उपस्थित राहणार आहेत.संख कार्यक्षेत्रामध्ये ३२ गावांचा समावेश
आहे.आठवड्यातून एक दिवस न्यायालयीन कामकाज चालणार आहे.जत तालुका हा विस्ताराने मोठा आहे.तालुक्यात प्रलंबित खटल्यांची संख्या देखील जास्त आहे.
त्यामुळे संख येथे ग्रामन्यायालय होणे अतिशय गरजेचे होतेयामुळे न्यायदानास सुलभता येणार असल्याचे खटावे यांनी स्पष्ट केले.यावेळी जत बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड. राजकुमार म्हमाणे,अँड. निटवे, अँड. सौदागर,अँड.नानासाहेबगडदे,अँड.बिरादार,अँड.हादिमनी उपस्थित होते दरम्यान, संख येथे न्यायालय व्हावे यासाठी जत तालुका वकील संघटनेचे सचिव अँड. सागर व्हनमाने यांनी सर्वप्रथम २०१९ मध्ये मागणी केली होती.अँड.व्हनमाने यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.