जत : अ भा किसान सभेच्या वतीने ईनाम वर्ग ३ जमिनींच्या प्रश्नावर राज्य अध्यक्ष कॉ.उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, जत तालुक्यात शेकडो हेक्टर देवस्थान ईनाम वर्ग ३ ची जमिन आहे या जमिनींच्या ७/१२ पत्रक वरील कब्जेदार सदरातील नावे इतर हक्कात नोंद केली आहेत.जिल्हाधिकारी सो यांनी सन २०११ साली पत्र क्र वतन / वशी ५३/२०११ दि १६ मे २०११ या पत्रकानुसार सातबारा पत्रक दुरूस्त करण्याविषयी कळवले होते.
आम्ही अनेकदा आपल्या कार्यालयास विनंती करून देखील त्यात बद्दल केला.यावरील क्रमांकाच्या पत्रकानुसार ७/१२पत्रकावरील दुरूस्ती व्हावी अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागले असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी कॉ.गुलाब मुलाणी,कॉ.हणमंत कोळी, यशवंत गोरे, जिब्राईल मुलाणी, नवाज मुलाणी,अदम मुजावर,रसुल मुजावर, अमन मुलाणी,पयंबर मुलाणी, शिकंदर मुजावर आदी उपस्थित होते.