जतचे प्रश्न विधासभेत गाजले, कोणकोणत्या नेत्यांने मांडले प्रश्न वाचा सविस्तर

0
3
आमदारांनी सभागृहे दणाणून सोडली
जत : जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर विधानसभेच्या पाऊसाळी अधिवेशनात आंदोलन, जोरदार चर्चेनंतर जतचे प्रश्न सलग तिसऱ्या दिवशी सभागृहात चर्चेच्या स्थानी आलेत.

जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जिल्ह्यातील कृष्णा वारणा या नद्यांना सध्या पूर परिस्थिती निर्माण झाल्याने त्या नद्यांचे पाणी म्हैसाळ, टेंभू ताकारी आरफळ या दुष्काळी भागांना पाणी देणाऱ्या योजना तात्काळ सुरू करून सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमंकाळ मिरज जत आटपाडी यासह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मंगळवेढा या तालुक्यांना पाणी देण्याची मागणी केली.

 

त्याचबरोबर विधानपरिषदेत आमदार गोपीचंद पडळकर,आमदार महादेव जानकर यांनी जत तालुक्याचे दुष्काळ,ग्राम न्यायालय,तालुका विभाजन,म्हैसाळ योजना,जत शहरासह ‌तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजना, विकास निधीचे मुद्दे मांडून सभागृहात जत तालुका कसा मागे राहिला हे ठासून सांगत निधीसह तातडीने दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठी नियोजित योजना तात्काळ पुर्ण कराव्यात अशी मागणी केली.

 

प्रथमच जत तालुक्याचे प्रश्न यंदा मोठ्या प्रमाणात गाजल्याचे पाह्याला मिळाले.जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अधिवेशन चालू झाल्यापासून प्रदर्शनाने अनेक मुद्दे सभागृहात मांडले.त्याचबरोबर दुष्काळ जाहीर करण्यासाठी केलेले सभागृहा बाहेरील आंदोलनाची गांभिर्यांने सरकारला दखल घ्यावी लागली आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here