जत : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर
विधानभवनासमोर विक्रमसिंह सावंत यांनी ठिय्या मांडत जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा म्हणून घोषणाबाजी केली. त्यानंतर आ.सावंत व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीत आ.सावंत यांनी जतकरांच्या व्यथा मांडल्या.यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, माजी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम उपस्थित होते.जत तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून पाऊस नाही. पाऊस नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे.जनावरांना चारा नाही.शेजारील कर्नाटकातून जादा दराने चारा घेण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे.
बळीराजा व पशुपालक चिंताग्रस्त आहेत.जतला तातडीने दुष्काळ जाहीर करुन सवलती द्याव्यात अशी आग्रही मागणी आ.सावंत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. माझ्या मतदार संघातील शेतकरी गेल्या दीड महिन्यांपासून विविध प्रकारे आंदोलने करीत आहे. शासनाने दखल न घेतल्यामुळे मला आज विधान भवनाच्या पायरीवर बसून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. तरी शासनाने त्वरित लक्ष घालून दुष्काळ जाहीर करावा, असे ते म्हणाले.यावेळी आ. सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जतच्या व्यथा मांडल्या.
कोटीचे टेंडर काढल्याचे समजते. उर्वरीत तालुक्यातील पाणी वितरकेचे कार्यवाही केली नाही. त्यामुळे ही योजना रखडणार आहे. सदर योजना कार्यान्वीत होईपर्यंत कर्नाटक राज्याकडे महाराष्ट्र राज्याचे ७.८५० टीएमसी पाणी शिल्लक असून त्यापैकी कोणताही खर्च न करता कर्नाटक राज्याची तुबची बबलेश्वर या योजनेतून माझ्या तालुक्यात पाणी मिळू शकते, तशी मागणी महाराष्ट्र शासनाने कर्नाटक राज्याकडे करुन माझ्या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना द्यावे, जत तालुक्यात म्हैसाळ योजनेचे थोडेफार पाणी आले आहे. त्यासाठी वीजपुरवठा कमी पडतो.शासनाने आमच्या तालुक्यास विद्युत उपकेंद्रे उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणीही सावंत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.