जत : आ.विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नाने ४ वर्षापासून अडलेले म्हैसाळ योजनेचे काम सुरु होऊन जत तालुक्यातील ११ गावांचा शेतीचा आणि पाण्याचा प्रश्न सुटला आज एकुंडी गावाच्या तलावात म्हैसाळ योजनेचे पहिल्यांदा पाणी आले.या म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे पूजन आ.विक्रमसिंह सावंत यांच्या शुभहस्ते करणेत आले.यावेळी एकूंडी परिसरातील शेतकऱ्यांनी आंनदोत्सव साजरा केला.पाणी येथपर्यत पोहविण्याचे शिल्पकार ठरलेले आमदार विक्रमसिंह सावंत यांची फटाके,ढोलताशांच्या गजरात भव्य रँली काढली.
यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडग, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, पंचायत समिती सदस्य पिराप्पा आण्णा माळी,बसवराज बिरादार,मारुती पवार,जे.के.माळी,भूपेंद्र कांबळे, येळदरी सरपंच रामचंद्र सरगर,रावसाहेब मंगसुळी यांच्यासह एकुंडीचे सरपंच सौ.निकिता सुरेश कांबळे सुरेश कांबळे बसगोंडा नाईक,बाबाण्णा नाईक श्रीमंत गुड्डोडगी,नाईक सर,महेश पाटील यांच्यासह मोठ्या नागरीक बंधू भगिनी उपस्थित होते.
दरम्यान एंकूडीत पाणी आणण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आमदार विक्रमसिंह सावंत यांची रथातून भव्य रँली काढण्यात आली.