माणिकनाळचे सुपुत्र डॉ.गुरू बगलींना कॉग्रेसने दिली मोठी जबाबदारी

0
10

करजगी : माणिकनाळ गावाचे सुपुत्र व मिरज येथील श्रीरत्ना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक गेल्या दशकाहून जास्त काळ वैद्यकीय सेवा देत असलेल्या तज्ञ डॉक्टर गुरु बगली यांना वैद्यकीय सेवा व सामाजिक कार्य ओळखून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वैद्यकीय सेलचे सचिव पदी निवड करता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.कॉग्रेसशी एकनिष्ठ असलेले बगली यांना पक्षाच्या प्रमुख नेत्यामध्ये काम करण्याची संधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.डॉ.बगली यांचे मिरज येथे श्री रत्ना मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हे प्रसिद्ध हॉस्पिटल कार्यरत आहे.

दरम्यान डॉ.बगली यांचा या निवडीबद्दल करजगी सर्व सेवा सोसायटी येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.तंटामुक्त अध्यक्ष जयवंत कलबुर्गी व गिरमल्लय्या मठपती यांच्याहस्ते फेटा बांधून शाल श्रीफळ व पुष्पहार घालत त्यांना गौरविण्यात आले.

यावेळी करजगी सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन भीमाशंकर मेडीदार,व्हाईस चेअरमन रफिकअहमद पटेल, सुभाष बालगांव,मम्मु पटेल, राचय्या मठपती, विठ्ठल बालगांव, माजी उपसरपंच साबू बालगाव, राजू तेली(पोलीस पाटील)आप्पासाहेब बगली, गोपाळ कांबळे (माजी सरपंच)रमजान जातगार, नबिअल्ला जागीरदार,गुडूलाल मुजावर,संतोष जेऊर,अशोक जाधव, कुमार जेऊर, यल्लाप्पा जाधव, मम्मू जातगार गावातील विविध मान्यवर उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here