मायथळ कॅनॉलमधून माडग्याळ ओढ्यात लवकरच म्हैसाळचे पाणी 

0
3
जत : मायथळ कॅनॉल मधून माडग्याळ ओढ्यात पाणी सोडनेसाठी खासदार संजयकाका पाटील यांच्या फंडातून 12 लाख मंजुरीचे पत्र अधीक्षक अभियंता श्री पाटोळे यांना देण्यात आले.यामुळे परिसरातील ओढापात्रातून दोंडानाला तलावापर्यत पाणी पोहचणार आहे.

 

यावेळी कार्यकारी अभियंता श्री.पवार,कार्यकारी अभियंता रोहित कोरे,कार्यकारी अभियंता श्री हारगुडे,जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे,रवींद सावंत,शिवाप्पा तावाशी,मोहन उर्फ भैय्या कुलकर्णी,अविनाश गडीकर,अविनाश सावंत,मिलिंद बापू पाटील व उपअभियंता श्री.खरमाटे,प्रमोदअप्पा शेंडगे उपस्थित होते.

 

 

याबाबत माहिती देताना प्रकाश जमदाडे म्हणाले,माडग्याळच्या शिवेरून म्हैसाळचे पाणी गेले आहे,परंतु माडग्याळला याचा काहीही फायदा नाही,म्हणून गेले तीन वर्षापासून मी व माडग्याळ मधील सर्व प्रमुख कार्यकर्ते प्रयत्न करीत आहोत. खासदार संजयकाका पाटील यांना पाच-सहा वेळा भेटून पाणी कस येऊ शकते,हे समजून सांगितले परंतु काही लोकाकडून श्रेय वादासाठी जाणून बुजून अडचणी आणल्या गेल्या.दरम्यान मंगळवारी खा.संजयकाकांनी सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.जिल्हाधिकारी यांना वस्तुस्थिती सांगितली व खर्चास मंजुरी देण्याची विनंती केली तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री.कपोले यांचेशी फोन वरून संपर्क साधून सदरची चर खोदणे कसे आवश्यक आहे,हे समजून सांगितले.

महामंडळाकडील मशिनरी देणेची विनंती केली,ती कपोले साहेबांनी मान्य केली व खासदार फंडातून डिझेल साठी 12 लाख रुपयचे पत्र तयार करून दिले लवकरच कामास सुरवात होऊन बऱ्याच दिवसाची माडग्याळ कराची प्रतीक्षा संपणार आहे.यासाठी कामासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांनी ही सध्या जत तालुक्यात भीषण टंचाई आहे,लवकर काम करून दिलासा द्यावा अशी विनंती केली.

 

 

सदर काम पूर्ण झाले नंतर माडग्याळ, कुलाळवाडी, सोन्याळ, उटगी,निगडी बु,उमदी या गावांना लाभ होणार असून दोड्डनाला माध्यम प्रकल्प भरला जाणार आहे.या कामासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी सततच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे व योगदानामुळे त्यांचे व सर्व अधिकारी यांचे माडग्याळ पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिक यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here