भाजप नेत्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेला जतच्या राजकारणातील उगवता चेहरा..

0
8
– तम्मनगौडा रविपाटील
तम्मनगौडा रविपाटील हे तालुक्यातील उच्चशिक्षीत व तरुण नेते आहेत. भाजपने या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना जत विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख पदांची जबाबदारी सोपवली आहे. त्याचबरोबर त्यांना भारत सरकारच्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा समितीवर सदस्य म्हणून संधी दिली आहे. अगदी तरूण वयात देशपातळीवर पोहोचलेले ते जत तालुक्यातील एकमेव नेते आहेत.  देशाचे महामहीम राष्ट्रपती ते सामान्य नागरिकांपर्यंत ज्यांची नाळ जोडली आहे, अशा प्रतिभावान नेत्यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा…

 

राजकारणावर हुकूमत व पकड असलेला युवा नेता म्हणून त्यांचा लौकिक आहे. भाजप दिलेली संधी व जबाबदारीचे त्यांनी सोने केले आहे. जत विधानसभा निवडणूक प्रमुख पदांची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यातील पहिल्या वाररूमचे जत तालुक्यात उद्घाटन केले. मोदी @9 अभियानाच्या माध्यमातून पक्षाला बळकटी देण्याचे काम सुरू केले आहे.
तम्मनगौडा रवीपाटील यांना कमी वयात जिल्हा परिषदेचे सभापती होण्याचा बहुमान मिळाला. शिक्षण, आरोग्य व क्रीडा या अत्यंत महत्वाच्या खात्यांचा कारभार ते पारदर्शी पध्दतीने केला आहे. त्यांचा भाजपचे निष्ठावंत नेते असा लौकिक आहे. अल्पावधीत तालुक्याच्या राजकारणावर त्यांनी आपली पकड मजबूत केली आहे. केंद्रीय नेते, मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. जिल्हाचे खासदार संजयकाका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष निशीकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्राचे नेते मकरंद देशपांडे, शेखर इनामदार यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील अनेक राजकीय नेते, धार्मिक संत पुरूष, उद्योजक यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध आहेत.
तम्मनगौडा ईश्वराप्पा रविपाटील यांचा जन्म जत तालुक्यातील जाडरबोबलाद गावी दि. २५ ऑगष्ट १९८२ रोजी झाला. बी. कॉम., एम.बी.ए असे शिक्षण त्यांनी घेतले. शेती व व्यवसाय शैक्षणिक संकुल असा मोठा व्याप असूनही त्यांनी घराण्याची परंपरा कायम ठेवून राजकारणात प्रवेश केला आहे. जतच्या राजकारणात अनेक घराण्यांचा प्रभाव आहे. त्यापैकी एक आहे, जाडरबोबलाद येथील रविपाटील घराणे. त्यांना सावकार म्हणूनही ओळखले जाते. या घराण्यातील सिद्रामप्पा रवि हे जत पंचायत समितीचे उपसभापती होते. तर ईश्वराप्पा रवि हे जिल्हा परिषद सदस्य होते. सिद्रामप्पा रवि यांचे सुपुत्र शिवाप्पा उर्फ पंपू रवि हे पंचायत समिती सदस्य होते. अनेक वर्षांपासून या परिसरात वर्चस्व असलेले हे घराणे आहे. मोठा लोकसंग्रह, तालेवार शेतकरी, लोकांना सर्वोतोपरी मदत करण्याचा स्वभाव त्यामुळे आजही त्यांचा तालुक्यातील राजकारणात प्रभाव आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण या सर्वच क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले आहे. महादुष्काळाच्या काळात संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांची तगई एकट्या सिद्रामप्पा यांनी भरली होती. सरकार दरबारी व जत राजपरिवारात त्यांना मोठा मान होता.
तरूण वयात तम्मनगौडा हे जाडरबोबलाद जि. प. मतदार संघातून २०१७ साली भाजपचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण व क्रीडा या विभागाच्या सभापतीपदाचा बहुमान मिळाला. या दोन्ही महत्वाच्या अस्थापनांची धूरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. आरोग्य केंद्रे व शाळांत अनेक सुविधा त्यांनी निर्माण केल्या. ऊर्जा निर्मितीत शाळा स्वयंपूर्ण बनविण्याचा त्यांचा उपक्रम होता. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, डिजीटल क्लासरूम, पहिलीपासून इंग्रजी हे उपक्रम त्यांनी राबविले. जाडरबोबलाद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून अत्याधुनिक इमारत उभारणी केली आहे. मुचंडी व कुंभारी प्राथमिक आरोग्य केंद्रे, अनेक उपकेंद्रांना मान्यता दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. भाजपने त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली आहे. तरुण सभापती म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. जाडरबोबलाद, सोन्याळ, अंकलगी व बालगाव या चार गावांसाठी त्यांनी ९ कोटी ९६ लाख रूपयांच्या राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर केल्या आहेत. रस्ते, शाळांच्या इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी मोठा निधी आणला आहे. तालुक्यात नवी प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
जत तालुक्यात केंद्र सरकारच्या लघु व सुक्ष्म उद्योग मंत्रालयाकडून 30 कोटी रुपयांचे बेदाणा क्लस्टर मंजूर करण्यात आले आहे. त्याची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. जत तालुक्यात युरोपच्या धर्तीवर बेदाणा निर्मिती व द्राक्ष शेती करण्याचा त्यांचा मानस आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here