सांगली : म्हैसाळ सिंचन योजनेतून माडग्याळ ता.जत ओढापात्रात पाणी सोडण्यासाठी सुरू असलेल्या चरीचे काम वनविभागाकडून थांबविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर खा.संजयकाका पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी,पाटबंधारे विभागाचे अधिकारी व स्थानिक प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.सर्व बाजूचे म्हणणे यावेळी मांडण़्यात आले.दुष्काळी परिस्थिती पाहता सध्या शेतकऱ्यांना पाणी देण्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याची भूमिका खा.संजयकाका पाटील यांनी मांडली.
दरम्यान पाटबंधारे विभागाने रितसर प्रस्ताव द्यावा,आम्ही त्यास मान्यता देऊ अशी भूमिका मांडल्यानंतर पाटबंधारे विभागाने तसा प्रस्ताव सादर केला आहे.त्याला मंजूरी मिळताच गतीने काम सुरू करण्यात येईल असे प्रकाशराव जमदाडे यांनी सांगितले.खा.पाटील,माजी आमदार विलासराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माडग्याळ तलावात पाणी आणूचं,असे उद्गार जमदाडे यांनी यावेळी काढले.