मध्यरात्री घरावर चोरट्याचा डल्ला,तीन लाखावर ऐवज लंपास

0
3
विटा ता.खानापूर येथे मध्यरात्री घरात घुसत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिन्यासह तीन लाख रुपयांवर डल्ला मारला.विशेष म्हणजे घरातील लोक झोपली असताना बेडरुमच्या खिडकीचे ग्रील तोडून ही घरफोडी झाली.घरफोडी झालेले घर हे आमदार अनिलराव बाबर यांच्या नातेवाईकांचे आहे.या प्रकरणी पोपटराव जाधव यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साळशिंगे रोडवरील सिद्धिविनायक कॉलनीमध्ये पोपटराव जाधव यांचे घर आहे. ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून ते पत्नीसह या घरामध्ये राहतात.मंगळवारी सकाळी उठल्यानंतर जाधव यांना बेडरूमचे ग्रील तुटल्याचे लक्षात येताच चोरीचा प्रकार  निदर्शनास आला. त्यांनी याबाबतची फिर्याद विटा पोलिसात दिली.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक पोपटराव जाधव हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिलराव बाबर यांचे व्याही आणि माजी नगरसेवक अमोल बाबर यांचे सासरे आहेत.मध्यरात्री घडलेल्या या घटनेने भितीचे वातावरण पसरले आहे.या घरफोडीत ६० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या १० अंगठ्या, ६० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या २० ग्रॅम वजनाच्या २ वेडन अंगठ्या आणि १ लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण सुमारे ३ लाख ५ हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.

याप्रकरणी विभागीय अधिकारी पद्या कदम यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत,तपास सुरू केला आहे.घटनास्थळी श्वानपथक मागवण्यात आले. तसेच चोरी झालेल्या ठिकाणी फिंगर प्रिंटसही घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष डोके करीत आहेत.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here