उमदी विषबाधाप्रकरणी अखेर 5 जणावर गुन्हा दाखल

0
0
जत : उमदी(ता.जत) येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा घटनेची गंभीर दखल घेत अखेर तीन दिवसांनी जबाबादार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संस्थेचा सचिव, दोन मुख्याध्यापक, दोन अधीक्षक यांच्याविरोधात बुधवारी रात्री उशिरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संस्थेचे सचिव श्रीशैल कल्लाप्पा होर्तीकर,मुख्याध्यापक सुभाषचंद्र महादेवाप्पा होर्ती, मुख्याध्यापक सुरेश चनगोंड बगली,अधीक्षक सुभाषचंद्र विकास‌ तुकाराम पवार,अधिक्षिका अक्कमहादेवी सिध्धन्ना निवर्गी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सांगलीतील समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त चाचरकर यांनी फिर्याद दिली आहे.दि. 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी समता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना बाहेरील जेवण देण्यात आले होते.ते जेवन खाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागताच त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले.

यामध्ये 168 मुलांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले.घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्ह्यातील सर्वच यंत्रणा कामाला लागल्या. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. राज्य शासनाने याची गंभीर दखल घेत वरीष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सांगलीत पाठवले. चौकशी, तपासणी झाल्यानंतर अखेर बुधवारी रात्री उशिरा याप्रकरणी समाजकल्याणचे आयुक्त चाचरकर फिर्याद दिलीयाप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये संशयितांनी निष्काळजीपणा,हयगय केली.शासनाचे नियम डावलून विद्यार्थ्यांच्या जीवितास, वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणल्याची कृती केल्याने जाबबदार धरत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे अधिक तपास करत आहेत.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here