तासगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून तासगाव आगारास 20 नवीन बसेस मिळाल्या आहेत. या बसेसचा लोकार्पण सोहळा उद्या (गुरुवार) सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे, अशी माहिती आगर प्रमुख दयानंद पाटील यांनी दिली. या सोहळ्यास पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील उपस्थित राहणार आहे.
आगारास अधिकच्या बसेस मिळाव्यात, ही मागणी जोर धरू लागली होती. लोकप्रतिनिधींनीही जादा बसेससाठी एसटी महामंडळाकडे रेटा लावला होता. सर्वांच्या प्रयत्नामुळे काही दिवसांपूर्वी 4 तर दोन दिवसांपूर्वी 16 बसेस तासगाव आगाराच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.आज (गुरुवार) सकाळी 10 वाजता या 20 बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यास पालकमंत्री खाडे, खासदार पाटील, आमदार पाटील उपस्थित राहणार आहेत.