जत तालुक्यातील शेतकरी बांधवांचे वीज वितरण सेवा मिळण्यासाठी कार्यालयासमोर नाथा पाटील विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. तातडीने कामकाजात सुधारणा करा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.
आम्ही जत तालुक्यातील शेतकरी आपणाकडे बोंबाबोंब आंदोलनाच्या माध्यमातून तालुक्यातील वीज वितरण कंपनी कडून वीज वितरण सेवा अनियमीत सुरू आहे तसेच रोहिणीयंत्र (टीसी) नादुरुस्त झाल्यावर वेळेवर दुरुस्त करून मिळत नाहीत तसेच मंजुर रोहिणीयंत्र (टीसी) मंजुर असूनही ठेकेदारांनी वर्ष उलटूनही कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळे शासनाचा आणि शेतकरी ग्राहकांचा वेळ आणि पैसे याचे नुकसान होत आहे अशा ठेकेदारांना काळ्या यादीत घालावे आणि कोटेशन भरलेल्या ग्राहकांना लवकरात लवकर कनेक्शन देण्यात यावीत, वीज कनेक्शन मागणी केलेल्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन न देता वीज बिले देण्यात येत आहे ही शेतकरी बांधवांना मानसिक त्रास देऊन कुचेष्टा करण्याचा प्रकार त्वरित थांबवावा या मागण्या आम्ही बोंबाबोंब आंदोलनाच्या माध्यमातून निदर्शनास आणून देत आहे यावर तातडीने कार्यवाही करून शेतकरी बांधवांची गैरसोय थांबवावी अशी मागणी नाथा पाटील यांनी केली.
राज्य वीज नियामक आयोग यांनी वितरण कंपनीची कृती मानके निश्चित केलेली आहेत त्याप्रमाणे वीज वितरण सेवा आणि नादुरुस्त जळालेली रोहिणीयंत्र (टीसी) दुरुस्त करून मिळावीत.अन्यथा पुढील काळात आपल्या कार्यालयासमोर जत तालुक्यातील शेतकरी बांधवांना सोबत घेऊन आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा विक्रम ढोणे यांनी दिला.
निवेदन स्वीकारण्यासाठी उपअभियंता श्री बंडगर आले असता सरपंच आणि शेतकऱ्यांनी आक्रमक होत प्रश्नाचा भडीमार केला, आणि कामचुकार अधिकारी,कर्मचारी ,ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विविध गावच्या सरपंचांनी लावून धरली असता श्री बंडगर यांनी कामात सुधारणा करतो आणि ठेकेदार अधिकारी कर्मचारी यांच्या कारवाईसाठी वरिष्ठ पातळीवर योग्य तो पाठपुरावा करतो असे आश्वासन दिल्यावर शेतकरी शांत झाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश माळी,वाहतूक संघटनेचे पदाधिकारी संतोष मोटे,दयानंद एवळे,सहिसाब नदाफ यांनी पाठिंबा दिला.यावेळी विविध गावचे सरपंच ,पदाधिकारी तुकाराम खांडेकर, राजू शिंदे, करण शेंडगे, मनोहर सरगर, तानाजी भिसले,कृष्णा जाधव,धनाजी शिंदे,आशिष शिंदे,योगेश एडके,शिवाजी बंडगर,उत्तम म्हरणुर, रमेश माळी,अशोक चौगुले आबा गावडे, पिरसाब शेख,अधिक सुर्यवंशी,बाळासाहेब खांडेकर तानाजी कटरे,विकास लेंगरे यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.