कॉग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करणारे तुकाराम माळी सर

0
6
महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे ओबीसी विभागाचे राज्य उपाध्यक्ष जतचे जेष्ठ नेते
तुकाराम माळी सर,यांचा आज वाढदिवस ‌त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा…
आदर्श शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले तुकाराम माळी सर यांचा जन्म रविवार दिनांक १४ नोंव्हेबर १९५८ रोजी आई हरूबाई व पिता मल्लाप्पा शिवाप्पा माळी  यांचे पोटी मध्यम वर्गीय कुंटुबात  झाला.वडील व्यवसायाने शेतकरी १९७२ सालच्या दुष्काळ आपतीमुळे शेतकरी यांची परस्थिती बिकट झाली शाळा शिकण्याची सुद्धा अवस्था नव्हती.मात्र तुकाराम माळी सर यांची महत्त्वकांक्षा व शिकण्याची आवड यामुळे त्यानी प्राथमिक शिक्षण जिप शाळा नं.१ येथे पहिली ते तिसरी जिप शाळा नं.२ येथे तिसरी ते सातवी व श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल जत येथे आठवी ते बारावी अखेर झाले.जत येथे विज्ञान महाविद्यालयाची सोय नसल्याने विलींग्डन महाविद्यालय सांगली मधून रसायन शास्त्राची पदवी त्यांनी घेतली.त्यांना शिक्षकी पेशाची सुरवातीला आवड नव्हती परंतू त्या काळत पदवीधर विज्ञान शिक्षकांना फार मोठी मागणी होती त्यामुळे त्यांनी लांजा तालुक्यातील भांबेड न्यू इंग्लिश स्कूल मध्ये गणित विज्ञान शिक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांना शिक्षककी पेशाची आवड निर्माण झाली. नंतर त्यांना शारिरीक शिक्षण मधील पदवी सोलापूर येथून घेतली.
भारत शिक्षण संस्था उटगीचे श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल येळवी येथे शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून रूजू झाले.भारत शिक्षण संस्था उटगीचे संस्थापक अध्यक्ष संगाप्पाण्णा काराजनगी व उपाध्यक्ष एम.बी.पाटील यांचे फार मोठे सामाजिक कार्य होते.त्यांची प्रेरणा व येळवी गावातील नागरिकांचे सहकार्याने तुकाराम माळी, यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली.त्यांच्या संपूर्ण शिक्षक सेवेच्या कालावधी मध्ये भारत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी,येळवी गावचे नागरिक आणि विद्यार्थ्यांचे फार मोठे सहकार्य असल्याने त्यांनी आपले सामाजिक कार्य नेटाने केले.शिक्षक म्हणून काम करत असताना शिक्षक नेते,आदर्श शिक्षक,नागनाथ वामन बुवा आणि वसंतराव गडदे यांच्या बरोबर टीडीएफ या शिक्षक संघटनेचे कार्य हिरारीने केले.नागनाथ बुवा सर आणि वसंतराव गडदे सर राष्ट्र सेवा दलात काम करीत असल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचे विरोधात वैचारिक भूमिका घेत असल्यामुळे हेच संस्कार तुकाराम माळी सर यांचेवर झाल्याने बुद्ध, बसवण्णा, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचाराचा पगडा माळी सरांवर पडला. बुवा सर यांचेबरोबर टीडीएफ शिक्षक संघटनेचे काम करीत असल्यामुळे जिल्ह्यातील नेते बी.आर.पाटील यांनी तुकाराम माळी सर यांना महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्टिकोनातून मोठी असलेल्या शिक्षण सेवक सहकारी संस्थेचे संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली.ज्येष्ठ संचालक अशोक सकळे सर व बी.आर.पाटील सर यांनी माळी सर यांना फार मोठे सहकार्य मिळाले.

 

पंचवार्षिक कालावधी संपल्यानंतर परत जागा न आडवता दूसऱ्यांना संधी देण्यासाठी स्वतः बाजूला होऊन समाजातील उपेक्षित ओबीसी वर्गासाठी नेटाने सुरू केले.महाराष्ट्र राज्याचे ओबीसी नेते माजी मंत्री सुधाकर गणगणे यांचे ओबीसी संघटनेच्या मध्ये मोलाची कामगिरी केली.देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अर्जुन सिंग यांचा ठसा माळी सर यांचेवर असल्याने त्यांनी त्यांचे विचार घेऊन कॉग्रेस पक्षाचे निष्ठेने कार्य निरंतर सुरू आहे.

 

अलिकडील काळात माते महादेवी यांचे बसव धर्म पीठ कुडल संगम यांचे विश्वगुरू बसवण्णा यांना विचारांच्या कार्याने प्रेरित होऊन महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील लिंगायत महामोर्चा यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिध्दरामया आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार ज्येष्ठ मंत्री एम.बी.पाटील याचे विचारांच्या पगडा तुकाराम माळी सर यांचेवर आहे.महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व.पतंगराव कदम साहेब आणि त्यांचे बंधू मोहनराव कदम यांच्या नेतृत्वाखाली तुकाराम माळी सर यांनी काम केले आहे. ‘डॉ.पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजीत ऊर्फ बाळासाहेब कदम यांचा विनम्र स्वभाव व काम करण्याची हातोटी महाराष्ट्र राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व विश्वजीत ऊर्फ बाळासाहेब कदम यांच्याकडे नेतृत्वाखाली तुकाराम माळी सर काम करत असून डॉ.पतंगराव कदम साहेब यांना दोन तीन वेळा कॉग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होण्याची संधी थोडक्यात हुकली ती संधी विश्वजीत ऊर्फ बाळासाहेब कदम यांना मिळावी म्हणून तुकाराम माळी सर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्यात सध्या कार्यरत आहेत.तुकाराम माळी सर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…
शंब्दाकंन :
मोहन मानेपाटील
जत तालुका सेवा दल अध्यक्ष
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here