आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या लक्षवेधीला यश,या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

0
2
जत : राज्यातील समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमांतर्गत करार पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा मुद्दा डिसेंबर महिन्याच्या  विधिमंडळ अधिवेशनामध्ये जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी उपस्थित केला होता.यासंदर्भात समग्र शिक्षा सांगलीचे अध्यक्ष सुरेंद्र सरनाईक यांनी आ.सावंत यांना निवेदन सादर केले होते.यासंदर्भात विधान सभागृहात पुरवणी मागणीवर बोलताना संपूर्ण सभागृहाचे लक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी वेधले होते.
त्यानंतर वेळोवेळी समग्र शिक्षा मानधन वाढीसाठी व कायमसाठी पाठपुरावा केल्यामुळे आम्हाला ही पगार ‌वाढ मिळाली असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ ची बैठक संभाजीनगर औरंगाबाद येथे पार पडली या बैठकीत शिक्षण विभागा अंतर्गत दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.त्यापैकी एक म्हणजे समग्र शिक्षा मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमातंर्गत करार पध्दतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.राज्य स्तरावरील कार्यालयात ६४ व जिल्हा स्तरावरील कार्यालयात ६१८७ असे एकूण ६२५१ कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.
या संदर्भात राज्य शासनाने आदेश जारी केला आहे. राज्यातील तमाम समग्र शिक्षा कर्मचारी व सांगली जिल्ह्यातील सर्व समग्र कर्मचारी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत नेहमीच कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कटिबद्ध असतात म्हणून सांगली जिल्हा समग्र शिक्षा कर्मचारी संघटनेच्या वतीने आ.सावंत यांचे आभार मानण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र सरनाईक, महेश पाटील (वाळवा),प्रदिप कदम(शिराळा), नामदेव शेळके(कवठेमहांकाळ),संजय यादव(मिरज)धनंजय भोळे(पलूस), नानासाहेब कदम (कडेगांव),वैभव बंडगर (तासगांव)श्रीरंग वायदंडे(आटपाडी)जिल्हा परिषद अर्जुन चव्हाण,प्रशांत शेटे,इंजि उमेश पाटील संतोष ढवळे,राहूल कुंभार,शब्बीर फकीर, विनोद शेंडगे,भालचंद्र कोळी,सचिन लवळे, रुपाली चौथे,जिल्हा सचिव प्रशांत चंदनशिवे (आटपाडी) यांनी आभार मानले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here