जगात भारताला शांतीचे “प्रतीक” मानल्या जाते.विश्र्वशांतीची सुरूवात भारतानेच केली आणि पुढेही “विश्र्व शांतीची जोत”भारताकडून अशीच “प्रज्वलित” राहील हे आपल्याला जी-20 शिखर परिषदेवरून लक्षात येते.आज जगात शांती कशी प्रस्थापीत करता येईल याकडे भारताचे संपूर्ण लक्ष आहे.भारत हा देवी-देवता,ऋषि-मुनी,साधु-संत,
भारताने नेहमी शांततेचा पुरस्कार केला आहे आणि करीत राहिल.”गौतम बुध्दासारख्या महाज्ञानी” यांनी भारतात शांतीची जोत प्रज्वलीत केली व संपूर्ण जगभर फिरवीली.”मर्यादा पुरूषोत्तम राम” यांनी सुध्दा शांततेचा पाठ संपूर्ण जगाला शिकवणीला व इस्लामिक धर्मगुरू “महम्मद पैगंबर” यांनी सुध्दा विश्र्व शांती करीता मोठे अभियान छेडले होते त्याचप्रमाणे “शिख गुरू गुरूनानक देवजी” यांनीही शांती प्रस्थापित करण्यासाठी मोलाची कामगिरी केली.पुर्वी आणि आताही विश्वात शांती प्रस्थापित करण्यासाठी भारत अग्रेसर होता आणि आहे.यात तिळमात्र शंका नाही.आज संपूर्ण जग बारूदच्या ढीगाऱ्यावर बसलेले आहे.चीनने जगात अशांतीचे वातावरण निर्माण करून वेळोवेळी”तिसऱ्या महायुद्धाची आहाट” ऐकु येत आहे.जगात शांती प्रस्थापित करण्यासाठी भारत संपूर्ण ताकद लावीत आहे तर चीन शांती भंग करण्याच्या तयारीत आहे.परंतु भारताचे काम शांततेने होत नसेल तर भारतही “उग्ररूप” धारण करून चीनला पटकनी देवु शकते.मानवाचा जन्म शांतता प्रस्थापित करण्यासाठी व जिवसृष्टीचे संरक्षण करण्यासाठी झाला आहे.परंतु चीन कुत्रे, मांजर, चामगाधड,पाल,साप,जे भेटेल ते खातात त्यामुळे आज चीनची बुध्दी कुत्र्यासारखी झाली आहे.त्यामुळे चीनने जर शांती भंग केली तर “कुत्ते की मौत मारा जायेगा” ही बाब चीनने लक्षात ठेवली पाहिजे.कारण वेळ पडल्यास तैवान चीनला सूध्दा भारी पडु शकतो.
जगात आतंकवाद दिवसेंदिवस वाढत होता यामुळे जगातील संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण होवून शांती भंग होत होती.शेवटी संपूर्ण जगाला शपथ घ्यावी लागली की जगात शांती प्रस्थापित करण्यासाठी आतंकवाद्यांचा खात्मा होणे गरजेचे आहे.त्या पध्दतीने प्रत्येक देशांनी आतंकवाद्यांविरूध्द कारवाईला सुरुवात केली.कारण प्रत्येक देश आतंकवाद्यांच्या कारवाईने त्रस्त होते.परंतु संपूर्ण विश्र्वाला वाटायला लागले की आतंकवाद्यांचा नायनाट केल्याशिवाय जगात शांतता प्रस्थापित होवुच शकत नाही.त्या अनुषंगाने आज प्रत्येक देश शांततेसाठी आतंकवाद्यांचा खात्मा करण्यास दृढ “संकल्प” असल्याचे दिसून येते.परंतु चीनने जगात “करोणा संक्रमन”पसरवून लाखो लोकांचा जीव घेतला व करोडो लोकांचा जीव धोक्यात टाकला आणि विस्तारवादी नियतीचा अवलंब करून हिटलर प्रमाणे जगावर राज करण्याची स्वप्ने शि.जिनपिंग पहात आहे.चीनचे धोरण आहे की शेजारी राष्ट्रांची जमिन हडप करून सुपर पावर बनण्याची स्वप्ने पाहत आहे.
सध्याच्या परिस्थितीत भारत-चीनची सेना आमने-सामने आहेत.तरीही भारताने शांतीचा मार्ग अजुनही सोडलेला नाही.चीन शांतता हा शब्द समजत नसेल तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सेना नेहमीच सज्ज असते.सध्याच्या परीस्थितीत चिनच्या विस्तारवादी नितीमुळे विश्र्व शांती भंग होण्याच्या मार्गावर आहे.चीन-तैवान संघर्ष लक्षात घेता चायना सी मध्ये चीनला टक्कर देण्यासाठी अमेरिकेसह नाटो सेना सज्ज झाली आहे त्याचबरोबर जापान व ऑस्ट्रेलियाने सूध्दा कंबर कसली आहे. म्हणजेच सध्याच्या परिस्थितीत जगातील शांती भंग करण्याचे काम चीन करीत आहे.याचे प्रायचीत्य संपूर्ण जगाला भोगावे लागु शकते.जगात शांती प्रस्थापित व्हायची असेल तर चीनला त्याची जागा दाखवावीच लागेल.चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे संपूर्ण जगात “अशांतीचे वातावरण”निर्माण झाले आहे.जगाच्या पाठीवर भारत असा एकमेव देश आहे की ज्या ठिकाणी अनेक धर्माचे,जातीचे,पंथाचे व अनेक भाषा बोलणारे लोक रहातात.भारताने नेहमीच शांतीचा पुरस्कार केला आहे.
परंतु भारताशेजारी गद्दारांची फौज उभी ठाकली आहे.एकीकडे पाकिस्तानचा आतंकवाद व दुसरीकडे चीनची विस्तारवादी नीती यामुळे भारताने सुध्दा जशास तसे उत्तर देण्याचे ठाणले आहे.भारत नेहमी शेजारी राष्ट्रांसोबत शांती प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असतो.परंतु भारताचा जीवलग मित्र समजल्या जाणाऱ्या नेपाळनेसुध्दा चीनचे पाय चाटण्याचे काम करीत असतो व भारताच्या पाठीत खंजर खुपसण्याचे काम करतो हे आपण मागे पहाले.अशाप्रकारे भारता शेजारचे संपूर्ण राष्ट्रांना चीन आर्थिक मदत करून आपला कब्जा करून सैन्य सामुग्री व एअरबेस तयार करण्याच्या तयारीत आहे.चीनने वुहान मधुन करोणा व्हायरस पसरवून मानवजातीचा विश्र्वास घात करुन मृत्यूच्या खाईत लोटन्याचे काम केले आहे.
याचे प्रायचीत्य चीनला भोगावेच लागेल.आज विश्र्व शांति टिकवून ठेवण्यासाठी अती लोकसंख्या असलेल्या देशांनी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.जगाच्या पाठीवर लोकसंख्येच्या बाबतीत चीन नंतर भारताचा नंबर लागतो.परंतु भारताच्या भुभागाचा विचार केला तर जगात लोकसंख्येच्या बाबतीत भारत प्रथम क्रमांकावर असल्याचे दिसून येते.त्यामुळे भारताला शांती प्रस्थापित करण्याकरिता एक पाऊल पुढे टाकून”हम दो हमारा एक”ही मोहीम राबवुन लोकसंख्या नियंत्रणात आणाली पाहिजे.आज चीनी चांडालच्या घृनीत कृत्यामुळे व युध्द सामुग्रीच्या चढाओढीमुळे प्रत्येक देश अनेक द्वीधेमध्ये असल्याचे दिसून येते.या द्वीधेपासुन मुक्ती मिळवायची असेल तर प्रत्येक देशांनी अनुचाचण्या, घातक हतीयार, मिसाईल परीक्षण व करोणासारखे व्हायरस तयार करने इत्यादींवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.तेव्हाच विश्र्वात शांती प्रस्थापित होवु शकते.याला नाकारता येत नाही.आज संपूर्ण जगाला ग्यात आहे की विश्वामध्ये शांति प्रस्थापित करायची असेल तर भारताचा सहयोग अती आवश्यक आहे.त्यामुळेच आज संपूर्ण जग चीनच्या विरोधात भारतासोबत उभा आहे.त्यामुळे चीनने लक्षात ठेवले पाहिजे की युध्द हे कोणत्याही प्रकारचे समाधान राहुच शकत नाही.विश्वशांतीच्या बाबतीत भारत काय आहे हे विश्र्वाला “महात्मा गांधींनी” दाखवून दिले आणि आज 139 कोटी भारतीयांच्या छत्रछायेच्या माध्यमातून भारत विश्र्व शांतीचा मसिहा बनल्याचे दिसून येते.कारण प्रत्येक देशाला शांतीची गरज आहे.जगाच्या पाठीवर भारताने अनेक उतार-चढाव पाहीले आहेत.
यातुनच शांतीचा उगम झाल्याचे दिसून येते.भारताची संस्कृतीच शांतता प्रस्थापित करण्यासाठी झाली आहे.त्रेतायुग व्दापरयुग,सत्ययुग आणि कलयुगात सुध्दा भारतीय संस्कृतीने संपूर्ण जगाला शांततेची शिकवण दिली आहे.भारत भुमित महाभारत, रामायण इत्यादी ज्या घटना घडल्या त्या सर्व विश्र्व शांती करीता होत्या ही बाब संपूर्ण जगाने लक्षात ठेवली पाहिजे.भारतातुन जगात जो ही संदेश जातो तो विश्र्व शांती करीता असतो.भारताने पाकिस्तानला शांततेसाठी हजारो वेळा समजविले.परंतु त्यांच्या नसानसात व रक्तात क्रृरता स्पष्ट दीसुन आली. त्यामुळेच पाकिस्तानात आतंवाद उफाळलेला आहे व तो स्वतः रक्ताच्या लाथोळ्यात अडकल्याचे दिसून येते. त्यामुळेच पाकिस्तानपासुन इस्लामीक देशांसह इतर देश अलग-थलग पडल्याचे दिसून येते.विश्व शांती म्हणजे मानसिक सुख नसुन वन्यप्राणी,जीव-जंतु,जंगल संपदा, निसर्गाचे संतुलन, पृथ्वीचे संरक्षण या संपूर्ण बाबींवर योग्य नियंत्रण ठेवुन त्यांची जोपासना केली तर विश्वामध्ये आपोआप शांती नांदायला सुरूवात होईल. “विश्र्व हेची माझे घर”ही भुमिका जगातील प्रत्येक देशांनी व व्यक्तीने जोपासली पाहिजे.आज संपूर्ण जग प्रदुषणामुळे, अनेक आजारामुळे,युध्दजन्य परीस्थितीमुळे जगातील प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे.याला कुठेतरी रोखण्याची गरज आहे.विश्वामध्ये शांती प्रस्थापित करण्यामागे भारताचा “सर्वधर्मसमभाव” हा मुलमंत्र सार्थक ठरत आहे.कारण भारतात हिंदू,मुस्लिम,शिख,ईसाई, बौद्ध,फारसी,ख्रिश्चन इत्यादी अनेक धर्माचा व देवी-देवतांचा वास नेहमी नांदत असतो.
त्यामुळे विश्र्व शांतीच्या गंगेचा उगम भारतातुन झाल्याचे दिसून येते.या लेखाच्या माध्यमातून मी हेच सांगु इच्छितो की 21 सप्टेंबरला जगातील प्रत्येक व्यक्तीने शांतता प्रस्थापिकरण्यासाठी “संकल्प” करावा.जगातील देशांना मी आग्रह करेल की “विस्तारवादी”नीतीचा खात्मा करून जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.कारण विस्तारवादी नीती संपूर्ण जगाला “घातक” आहे.जगात भारताला विश्वशांतीचे उगमस्थान, दुत, आधारस्तंभ अशा अनेक उपमा दिल्या आहेत.याची जानीव चीनने ठेवली पाहिजे.करोना काळापासून संपूर्ण जग “नमस्कार” करायला लागले आहे हे सुद्धा भारतीय संस्कृतीचे शांतीचे “प्रतीक” आहे.सध्याच्या परिस्थितीत गेल्या सतरा महिन्यांपासून सुरू असलेले युक्रेन -रशिया युद्ध आणि चीन-तैवानचा वाढता संघर्ष टोकाला पोहोचले आहे याला शांत करण्यासाठी भारत अग्रेसर आहे हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. जगाला यशाकडे वाटचाल करायची असेल तर “शांतीचा मार्ग”अवलंबावाच लागेल मग तो कोणताही देश असो.21 सप्टेंबर “विश्र्व शांती”दिवस लक्षात घेता जगातील प्रत्येक देशांनी आजच्या दिवशी वृक्षारोपण करून शांतीचा संदेश संपूर्ण जगाला दिला पाहिजे.जय हिंद!
लेखक रमेश कृष्णराव लांजेवार (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.9921690779 नागपूर.