0
2
जत : फोन पे कस्टमर केअरचा प्रतिनिधी आहे असे सांगून कॉल वरून तुमचे फोन पे अपडेट करायचा आहे,असे सांगत  ओटीपी घेऊन ३ लाख ३१ हजार ९९९ रुपये बँकेतून परस्पर ट्रान्सफर करून घेतल्याचा प्रकार जत येथे घडला असून जतेतील एका तरुणांची फसवणूक झाल्याबद्दल जत पोलीसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटना २५ व २६ ऑगस्ट रोजी घडली आहे.

 

 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी जत तालुक्यातील एका तरूण व्यावसायिकास दि २५ ऑगस्ट रोजी ६२८९१२२२८२ या अनओळखी क्रमांकावरून कॉल आला होता. यावेळी फोन पे केअरचा प्रतिनिधी असल्याचं सांगत माहिती विचारण्यात आली, वेगवेगळे ऑप्शन सांगून मोबाइलची बटणे दाबण्यास सांगितली.यानंतर खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले.संबधित व्यापाऱ्यांने लगेच आलेल्या नंबरवर कॉल करून संपर्क साधला असता तुम्हाला पहिले पैसे मिळवून देऊ असे सांगत ही दुसऱ्या दिवशीही २६ ऑगस्ट रोजी १ लाख ९९९ रुपये इतकी रक्कम ट्रान्सफर झाली. संबंधित व्यक्तीच्या खात्यातून ऑनलाइनमधून ट्रान्सफर झालेली रक्कम ३ लाख ३१ हजार ९९९ रुपये इतकी आहे.सतत पैसे मागूनही न आल्याने संबंधित व्यापाऱ्यांच्या फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

 

 

त्यांनी पोलीस ठाणे गाठत घडला प्रकार सांगितल्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 नुसाक गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास जत पोलीस करत आहे
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here