विद्यार्थ्यांनी ध्येयवेडे असावे | – भाऊसाहेब रुपनर

0

फॅबटेक इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय टेक्नोफॅब २३ उत्साहात

 

सांगोला : विद्यार्थ्यांनी ध्येय वेडे असावे.स्वर्गीय बिरासाहेब रुपनर यांनी ध्येय मोठे ठेवले होते,त्यामुळेच हा फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचा वटवृक्ष आपण पाहतो आहोत.त्यामळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी मोठे स्वप्न पाहावे,त्याबरोबरच नेहमी संशोधन वृत्ती अंगीकृत करावी,असे आवाहन फँबटेकचे चेअरमन भाऊसाहेब रुपनर यांनी केले.

 

ते फॅबटेक टेक्निकल कॅम्पस ,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँण्ड रिसर्च मध्ये टेक्नोफॅब २३ या राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रंसगी बोलत होते.२१ ऑक्टोबर रोजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.टॉप गियर ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक,श्रीकांत पवार,प्रा.बी.डी.गायकवाड,(मेकॅनिकल विभाग,स्वेरी कॉलेज),प्रा.भीमाशंकर पैलवान (माजी प्राचार्य,विद्या मंदिर,सांगोला)यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

श्रीकांत पवार म्हणाले,सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे.नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे त्याबरोबर आपण आपले ज्ञान वाढविण्यासाठी नेहमी प्रयत्न करणे आवश्यक आहे.त्याच बरोबर तुमच्या कलागुणांना चालना देण्यासाठी तुम्ही सातत्याने पर्यंत केले पाहिजे,शैक्षणिक पदवी बरोबर तांत्रिक कौशल्य आत्मसात करावीत.खरे शिक्षण हे सामाजिक परिसंवादातून निर्माण व्हावे,नेहमी चांगली पुस्तके वाचली पाहिजेत,मोठी स्वप्न बघा, मोठे व्हायचे असेल तर सर्वोत्तम कष्ट करण्याची तयारी ठेवा,यश निश्चित मिळेल,असेही पवार म्हणाले.

 

Rate Card

प्रा.भीमाशंकर पैलवान म्हणाले,जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तांत्रिक विश्वात यश मिळवायचे असल्यास या क्षेत्रातील बदल स्विकारायला हवे व टेक्नोफॅब २३ सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना चालना मिळेल.स्पर्धेत राज्यातील सुमारे १७ महाविद्यालयातून १ हजार ५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.स्पर्धेमध्ये सर्व विभागाच्या मिळून २२ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांची देवाणघेवाण करणे, त्यांचे कार्य प्रदर्शित करणे आणि विविध क्षेत्रात उदयोन्मुख तंत्रज्ञान शोधणे त्याचबरोबर टेक्नोफॅब २३ या परिसंवादात मध्ये, पेपर प्रेझेंटेशन, टेक्निकल प्रश्नमंजुषा,रोबो रेस या सारख्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट संधी निर्माण करण्यात आली होती.

 

डॉ.सुभाष जाधव,प्रा.बी.डी गायकवाड,डॉ. डी एस बाडकर यांनी मार्गदर्शन केले.कार्यकारी संचालक दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे,प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. शरद पवार,सर्व विभागाचे विभाग प्रमुख व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप प्रा. प्रियांका पावसकर यांनी केले.

 

 

गेल्या काही वर्षात इंजिनिरिंग व औद्योगिक क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. हे बदलाचे आव्हान आता इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी स्विकारून त्यात संशोधन करून पुढे यशस्वी वाटचाल करावी. टेक्नोफॅब २३ या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाशी ओळख होत असून सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा यासाठी त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची माहीती होऊन त्यात आपले करियर करावे

– डॉ.अमित रुपनर
मॅनेजिंग डायरेक्टर,फँबटेक एज्यूकेशन

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.