विटा : विटा येथील प्रसिद्ध व्यावसायिक, नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतापशेठ महादेव साळुंखे यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.खानापूर तालुक्यासह संपूर्ण सांगली सातारा सोलापूरच्या दुष्काळी भागातील गलाई व्यवसायिकांचे ते आधारवड होते.गलाई व्यवसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते अग्रही होते.प्रतापशेठ साळुंखे यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडली होती. ते रक्तदाब आणि कंप वाताने आजारी होते.
प्रताप शेठ साळुंखे हे मुळचे खानापूर तालुक्यातील पारे येथील होते.प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील गलाई बांधवांची मोठे नुकसान झाले आहे.
प्रतापशेठ यांना वयाच्या १३ व्या वर्षी घरची आर्थिक परिस्थिती पाहून आपले शिक्षण अर्धवट सोडले आणि केरळमधील आलेप्पी या शहरात सोने गलाईच्या कामासाठी जावे लागले होते. तिथे नारळाच्या झावळ्या आणि केळीच्या खुंटांपासून तयार केलेल्या आडोशावर सोने गाळण्याची भट्टी सुरू केली. तिथून सुरू झालेला त्यांचा व्यवसायातील गेल्या ७० वर्षांचा प्रवास आदर्शवत व थक्क करणारा आहे. त्यांना एकूण सहा भावंडे आणि हे सर्वात मोठे. त्यामुळे या सर्वांची कौटुंबिक जबाबदारी त्यांच्याकडेच होती.
ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यांचे दोन भाऊ जयहिंद शेठ आणि सुरेशशेठ हे गलाई व्यवसायात मोठे आहेत, तर तिसरे विलासराव हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. बहिण संगीताक्का यांना दिवंगत मंत्री डॉ.पतंगराव कदम यांचे बंधू माजी आमदार मोहन शेठ कदम यांच्या घराण्यात विवाह करून दिले आहे,तर
देवकर घराण्यात, त्या वैद्यकीय क्षेत्रात आहेत.दुसऱ्या त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.
ऑल इंडिया नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी असोसिएशन या नावाने त्यांनी देशभरातील गलाई बांधवांची मोठी संघटना गेल्या १० वर्षां पूर्वी बांधली आहे. प्रतापशेठ साळुंखे यांचे सतीश आणि शेखर हे दोन्ही चिरंजीव वेगवेगळ्या व्यवसायात असून आपापल्या परीने वडिलांचे कार्य पुढे नेत आहेत.त्यांनी स्थापन केलेली शिवप्रताप मल्टिस्टेट ही बँक अनेकांची आधार बनली आहे.त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण जाली आहे.