करजगी : गुलगुंजनाळ ता.जत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बळवंत तुकाराम माने यांच्या बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच सौ.राणी दामाजी माने यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची सभा झाली.उपसरपंच पदासाठी बळवंत माने यांच्या एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी ग्रा.पं.सदस्य सविता नागेंद्र जाधव, कमलवा मारुती कोळी, शांताबाई परमेश्वर यादव, सिद्धाप्पा शासप्पा मेत्री, संगीता अनिल साळुंखे व नवनिर्वाचित उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी निवडणूक अधिकारी एम व्ही खोत, तलाठी बब्रुवान शिंदे, कनिष्ठ शाखा अभियंता राजेंद्र राजगे,ग्रामसेवक शामराव मुठेकर यांनी काम पाहिले.पोलीस पाटील गजानन जाधव, उमदी ठाण्याचे हवालदार गोदे,संजय यादव, दामाजी माने,संतोष चव्हाण, उमाजी माने,भरत चव्हाण, विठ्ठल साळुंखे,दिगंबर जाधव,विठ्ठल चव्हाण,रजनीकांत चव्हाण, हरिबा जाधव, परशुराम माने, मारुती कोळी, तीप्पणा शिंदे, मारुती साळुंखे, कोतवाल चंदू धंदेरगी, शिपाई सुरेश चव्हाण आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.




