संख : दरिकुनुर (ता.जत)येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सोरडी व नाबार्ड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या डिजिटल अभियानांतर्गत जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व योजनाची माहिती,कर्ज पुरवठा,ओटीएस योजना तसेच बँकेच्या वतीने कर्जदार शेतकरी सभासद यांचा रू दोन लाख अपघाती विमा उतरवणेत आला आहे तसेच बचत दोन गटांना रू दिड लाख रूपये प्रमाणे कर्ज मंजुरीचे पत्र देणेत आले.
यावेळी सरपंच अमीन शेख,माजी सरपंच विश्वास भोसले,इकबाल पठाण,सदाशिव व्हणमाने,विवेक कोकरे,अली पठाण,चंगोंडा पाटील,सोसायटीचे चेअरमन, व्हा चेअरमन,संचालक,सचिव,बँकेचे अधिकारी ,महिला बचत गट व शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.