प्रकाशराव जमदाडे जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या २ वर्षाचा लेखा-जोखा

0
10

जत : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या
२१ नोव्हेंबर २०२१ रोजी जत तालुक्यातील प्रकाशराव जमदाडे या सामान्य कार्यकर्त्यांचा विजय झाला होता.
६५०० कोटी रुपये ठेवी व जत तालुक्यात २५ शाखा कार्यरत असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विश्वस्त संचालक म्हणून जमदाडे यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.त्याला नुकतीच दोन वर्षे पुर्ण झाली असून दोन वर्षाच्या कार्यकाळात जमदाडे यांनी बँकेच्या माध्यमातून जत तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार ‌लावला असून शेती कर्जासह व्यवसायिक, होम लोनसह अनेक लाभाच्या‌ योजना सामान्य खातेदारांपर्यत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.बँकेच्या कर्जदारासाठी असणाऱ्या ओटीएस योजनेतून अनेक वर्षापासून थकित कर्जदार असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे मोठे काम जमदाडे यांनी पुढाकार घेत‌ तालुक्यात केले आहे.त्यांच्यावर दोन वर्षांच्या कार्यकाळाचा आम्ही जमदाडे यांच्या शंब्दात थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
जमदाडे म्हणाले,जत तालुक्यात ८२ सर्व सेवा सोसायटी आहेत मागील कालावधीत राजकारणाच्या कुरघोडीमुळे जवळपास निम्म्या सोसायटी बंद पडण्याच्या स्थितीत होत्या आम्ही कोणताही पक्ष भेद न करता सर्व सोसायटी यांना न्याय देण्याच्या प्रयत्न केला.दुष्काळामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्याचे दृष्टिकोनातून बँकेच्या 95 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) अमलात आणली.ओटीएस योजनेमुळे जून २०२३ अखेर १४ सोसायटी बँक पातळीवरती १०० टक्के वसुली झाली तर सनमडी सोसायटी सभासद व बँक पातळीवरती १०० टक्के वसुली झाली त्यांना ५० हजार बक्षीस मिळाले. तालुक्यातील सर्व सोसायटी चे एकंदरीत ६३.५० टक्के वसूली झाली.

ओटीएस योजनेचा २२९१ सभासदांनी लाभ घेतला त्यांना १६.४८ कोटी रुपये व्याजमाफीचा लाभ झाला. उमदीतील शेवाळे कुटुंबाला 45 लाख रु.व्याजमाफीचा फायदा झाला.तर बँकेच्या नफ्यातून सर्व सेवा सोसायटी यांना ११.४१ कोटी रुपये व्याज परतावा दिला. यामुळे सोसायटीच्या व्यस्त तफावत कमी होण्यास मदत झाली व सोसायटी सक्षम झाल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया(पी एम एफ ई) योजनेअंतर्गत ७२ सभासदांना ३.४६ कोटी कर्ज वाटप करून १.१६ कोटी रुपयांची अनुदान मिळवून दिले.
जमदाडे पुढे म्हणाले,आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ,इतर मागासवर्ग महामंडळ योजनेतून गरजू सभासदांना कर्ज पुरवठा करण्यात आला. शेतकऱ्यांना विहीर पाईपलाईन,गाय/म्हैस, गोटा, शेळी/मेंढी, चार चाकी / दोन चाकी वाहने, ट्रॅक्टर ऊस तोडणी मशीन, शैक्षणिक कर्ज आवश्यक ते शेतजमीन खरेदी बचत गटांचे अल्प दरात कर्जवाटप मागेल त्यास कर्जपुरवठा करून त्यांच्या आर्थिक सोयीत हातभार लावण्याचा प्रयत्न केला.बँकेच्या नफ्यातून पहिल्यांदाच कर्जदार सभासदांवर रुपये दोन लाख पर्यंतचा अपघाती विमा उतरवला आहे.योग्य कारणासाठी मागणी केल्यास त्यास कर्ज पुरवठा करण्यात आला.सर्व सोसायटी यांना भेटी देऊन ओटीएस योजनेचे महत्त्व पटवून दिले त्याचबरोबर डिजिटल साक्षरता अभियाना अंतर्गत तालुक्यातील गावा गावात मेळावे घेऊन बँकेच्या सर्व योजनांची माहिती दिली व लाभ घेण्याचे आव्हान केले.गेल्या दोन वर्षात कोणतेही राजकारण, पक्षपात न करता शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम केले याचा सार्थ अभिमान आहे. ही सर्व कामे करताना बँकेचे चेअरमन आमदार मानसिंगराव नाईक,व्हा.चेअरमन श्रीमती जयश्री ताई पाटील, सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ साहेब, सर्व खाते प्रमुख अधिकारी, कर्मचारी , तालुक्यातील संचालक मन्सूर खतीब, सरदार पाटील,सर्व सेवा सोसायटीचे सचिव, चेअरमन, व्हा.चेअरमन गावातील प्रमुख नेते व माझे सर्व सहकारी व पत्रकार बंधू यांचे सर्वांचे सहकार्य लाभले तसेच माजी आमदार विलासराव जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या सर्वांचे मनपूर्वक आभार यापुढे आपणा सर्वांचा पाठिंबा आणि आशीर्वाद कायम राहावा अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो,असेही जमदाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
योगायोग असा आहे की, २३ नोव्हेंबर २०२१ रोजी संकष्ट चतुर्थी होती आणि यंदा त्याच‌ दिवशी पांडुरंगाची कार्तिकी एकादशी हे दैवत आणि अध्यात्म मला कायम चांगले विचार आणि काम करण्यासाठी प्रेरणा आणि आशीर्वाद देत आहेत त्यांच्या आशिर्वादाने आपणा सर्वांचे काम करण्याची मला ऊर्जा मिळते याचा मला सार्थ अभिमान आहे.माझ्या कार्यकाळात तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या समृध्द करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे.
– प्रकाश वि.जमदाडे
संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि,सांगली
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here