गिरगावमध्ये पकडला १४ लाखाचा गांजा,संशयित ताब्यात

0
10

उमदी : गिरगाव(ता.जत) येथे १३ लाख ६८ हजार ६५० रुपयांचा १३६ कि. ८६५ ग्रॅम गांजा पोलीसांनी छापा टाकून जप्त केला. शनिवारी ही कारवाई करण्यात आली.संशयित आरोपीने कांद्याच्या शेतात ही गांज्याची रोपे लावली होती.याप्रकरणी सिंकदर बगसू कोतवाल (वय ५०) अस्मान बगसू कोतवाल ( वय ५० रा कोतवाल वस्ती, गिरगाव ता.जत) या दोन भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.पुर्व भागातील गांज्या शेती पुन्हा एकदा चर्चेत आली असून पोलीसांच्या सततच्या कारवाईनंतरही गांज्याची लागवड केली जात आहे.

 

शनीवारी केलेल्या कारवाईत शेतात सुमारे  ६ ते ७ फुट उंच असलेले १२७ गांजाचे हिरव्या रंगाचे ओलसर पानांची व उग्रवासाची झाडे होती. झाडे उपटून पाने, फांदी, खोडासह गांजाच्या हिरव्या झाडांचे अंदाजे वजन १३६ किलो ८६५ ग्रॅम इतके भरले आहे.जतच्या पुर्व भागातभागातील हद्दीतील गावापसून पूर्व भागातील कोतवाल वस्तीवर सिकंदर बगसू कोतवाल व उस्मान बगसू कोतवाल यांचे इंचगिरी रस्त्यावर शेत आहे. त्यांनी कांद्याच्या पिकात गांज्याच्या झाडांची लागवड केली आहे. याची माहिती उमदी पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात व कर्मचारी यांनी ही कारवाई केली.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिरीष शिंदे करीत आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here