सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक झाले असून ऊस दरासाठी रविवारी वसंतदादा कारखान्यावर धडक मारली.आंदोलक कार्यकर्त्यांकडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न पोलीसांनी रोखला.यावेळी कार्यकर्ते व पोलीसांमध्ये झटापट झाली.
सांगली जिल्ह्यातील ऊस दर जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सांगलीतील दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यावर काटाबंद आंदोलनासाठी एकत्र आले आहेत.
राजू शेट्टीचे नेतृत्वाखाली आता काटाबंदी आंदोलन करण्यात येत आहे. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखाना परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.