वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये खांद्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया दुर्बिनच्या सहाय्याने यशस्वी

0
3

सांगोला : सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये खांद्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया दुर्बीणीच्या साह्याने यशस्वी करण्यात आल्याची माहिती वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे प्रसिद्ध आर्थोकेअर तज्ञ एम. एस. आर्थो डॉ.धवल अवताडे यांनी दिली.लोटेवाडी येथील जयश्री सावंत यांच्या खांद्यातील धागे दोन महिन्यापूर्वी तुटले होते खांद्याची हालचाल करताना त्रास होत होता असंख्य वेदना होत होत्या त्यांनी वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रसिद्ध आर्थोकेवर तज्ञ  डॉ.धवल  आवताडे यांच्याशी चर्चा करून सर्व तपासण्या करून घेतल्या होत्या डॉ. धवल अवताडे यांनी त्यांना  शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.

 

 

वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्येे हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व शस्त्रक्रिया त्याचबरोबर गुडघ्यांची गादी तुटली असल्यास त्यांची शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.डॉ.धवल अवताडे यांनी त्यांना उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर दुर्बीणदारी यशस्वी शस्त्रक्रिया केली.त्यामुळे सांगोला शहर व तालुक्यासह आटपाडी ,जत ,कवठेमहाकाळ, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, आदि भागातील सर्व रुग्णांनी वेदांत मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे आर्थोकेअर तज्ञ  डॉ.धवल अवताडे यांच्याशी संपर्क साधावा अशी आवाहन  करण्यातआले आहे.

 

 

हाडांचे फ्रॅक्चर, गुडघ्याचे लिगामेंट (गादी) , खुबा बदलणे, गुडघे बदलणे, मणक्यांची नस दबणे मणक्याच्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत इतर कही शस्त्रक्रिया दुर्बीण द्वारे यशस्वीपणे करण्याचा वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here