जत : राज्य सरकारी कर्मचारी, मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन यांच्या संयुक्त आदेशाने सांगली जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी १४ डिसेंबर पासून बेमुदत संपात सहभागी होणार आहेत,अशी माहिती जिल्हा अध्यक्ष हाजीसाहेब मुजावर यांनी दिली.
मुजावर म्हणाले,संपूर्ण देशात विविध राज्यांमध्ये सरकारी व निमसरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.जुनी पेन्शन हा मुद्दा २००५ पासून चर्चेत आहे. महाराष्ट्रात कोणत्याही सरकारने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.
आर्थिक सबब सांगुन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील राजस्थान, पंजाब, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन सोजना पूर्वलक्षी प्रभावाने लागु केली आहे. परंतु महाराष्ट्र सरकार मात्र जाणीवपूर्णक जुन्या पेन्शन योजनेकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारचे लक्ष वेदण्याकरीता वेगवेगळ्या संघटनेतील १७ लाख कर्मचारी १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
तसेच सरकारी व निमसरकारी कर्मचारी, शिक्षकांना सन्मानाने जगणेकरीता, नवीन पेन्शन योजना (NPS) रदद करून सर्वाना जुनी पेन्शन योजना (OPS) पूर्वलक्षी प्रभावाने लागु करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे, रिक्त पदे भरणे, विनाअट अनुकंप नियुक्ती,कंत्राटीकरण धोरणाचे उच्चाटन करणे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक पद भरती वरील बंदी उठविणे, शिक्षण क्षेत्रातील दत्तक योजना, समुह शाळा योजनाद्वारे शाळेचे होणारे कार्पोरेट धर्जिने खाजगीकरण रदद करणे, नवीन शिक्षण धोरणाचा पुर्नविचार करणे, ५ व्या वेतन आयोगा पासूनच्या वेतन त्रुटी दुर करण्यासाठी यंत्रणा स्थापित करणे, सेवा निवृत्तीचे वय ६० करणे, या महत्वाच्या प्रमुख मागण्या करीता सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) बेमुदत संपात सहभागी होणार आहेत.यावेळी सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.