सुनिलबापू चव्हाण विचारमंच्यांमुळे २३ जणांना नवी दृष्टी

0
14
टेके आय क्लिनिक कडून मोफत मोतीबिंदू शस्ञक्रिया
डफळापूर : स्व. सुनिलबापू चव्हाण विचारमंच याच्यांवतीने आयोजित मोफत डोळे तपासणी शिबिरातील २३ जणांची मोफत मोतीबिंदू शस्ञक्रिया मोफत करण्यात आली.विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी या २३ रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्ञक्रिया करून घरी सोडण्यात आले.स्व.सुनिलबापू चव्हाण विचार मंच डफळापूर व श्री टेके आय क्लिनिक सांगली(जत) यांच्यांकडून गुरूवार ता.१४ रोजी डफळापूर येथे भव्य मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्ञक्रिया शिबीर संपन्न झाले.या शिबिरात १६० जणांची तपासणी करण्यात आली.यावेळी केलेल्या तपासणीत मोतीबिंदू शस्ञक्रिया २५,चष्मा लागलेले २० जण,डोळ्यावर मास वाढलेले ३,पडदा समस्या असलेले १० रुग्ण आढळून आले.

 

यावेळी तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांच्या डोळ्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या.टेके आय क्लिनिकचे डॉ.युवराज कांबळे,डॉ.शिवराम कांबळे,डॉ.मयुरी पाटील,सुनंदा गिळे,मनीषा वाघमारे,गंगाराम कांबळे आदीनी या शिबिरासाठी कष्ट घेतले.
यावेळी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण व बाजार समितीचे माजी संचालक अभिजित चव्हाण,अंबादास कुंभार,बाळासाहेब शांत,दिलीप भोसले,अशोक भोसले,सुभाष पाटोळे,धनाजी चव्हाण, सुरेन्द्र सरनाईक,शिवराज हताळे,देवदास चव्हाण,दिपक चव्हाण, सुनिल पाटील,उपसरपंच गणेश पाटोळे,सदस्य हर्षवर्धन चव्हाण,विकास वाघमारे,बाळासाहेब कोळी,दिपक कांबळे,दिपक कोळी,सोसायटी सदस्य अजित माने, मन्सूर नदाफ,तानाजी चव्हाण, पप्पू वाघमारे,वैभव शिंदे,सागर चव्हाण,विकास शिंदे,अमित शांत,रणजित चव्हाण,अशोक चव्हाण,विजय संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
२३ जणांना आता नवी दृष्टी
प्रथमचं सुनिलबापू चव्हाण विचार मंचाच्या वतीने डफळापूर येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे येथे नुसती तपासणीच नव्हे तर तपासणी केलेल्या २३ रुग्णावर  दुसऱ्यादिवशी मोतीबिंदू शस्ञक्रिया करण्यात आली असून त्यांना यामुळे नवी दृष्टी मिळाली आहे.या शिबिरातील अजून २५ रुग्णांवर मोतीबिंदू शस्ञक्रिया करण्यात येणार आहे.
डफळापूर : येथील सुनिलबापू चव्हाण विचार मंच यांच्याकडून मोतीबिंदू शस्ञक्रियेसाठी रुग्ण रवाना करण्यात आले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here