खाऊचे आमिष दाखवून बालिकेवर अतिप्रंसग,तिघा अल्पवयीन मुलांचे कृत्य

0
12
जतेत ७ वर्षीय बालिकेवर खाऊचे आमिष दाखवत तिघा अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार जत तालुक्यातील एका गावात घटला आहे.गुरुवार दि. १४ राेजी शाळा ‌सुटल्यानंतर घरी ‌चाललेल्या बालिकेवर हा प्रसंग उद्भवला आहे. संशयित तीघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडिता गावापासून ४ किलोमीटर असणाऱ्या वस्तीवरून गावात चालत शाळेत जाते.जवळच्या वस्तीवर असलेली १२, १४ व १६ वर्षाची तीन मुलेही त्याच शाळेत शिकतात.सर्वजण दररोज एकत्रच शाळेत जात येत असत.दोन दिवसापुर्वी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर या तीन मुलांनी पीडितेला खाऊ देण्याचे आमिष दाखविले.त्यानंतर रस्त्याच्याकडेला असलेल्या ओहळीत नेहत,तिच्यावर अतिप्रंसग केला आहे. रात्री वेदना असह्य झाल्याने तिने आईला आपल्याला त्रास हाेत असल्याचे सांगितले.

 

त्यानंतर उपचारासाठी नेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी पोलीसांनी अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here