जत : भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप हे भाजपचेच असलेले खासदार संजयकाका पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर व पारंपारिक विरोधक विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यावर सतत जोरदार टीका करत असतात. मात्र,माडग्याळ येथे पाणी पूजन कार्यक्रमादरम्यान जगताप यांच्या घरी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास हे सारे नेते एकत्र येत हास्य रंगात रंगलेले दिसले.
त्याचे झाले असे, माडग्याळ येथील पाणी पूजनाच्या कार्यक्रमास जाण्यापूर्वी खासदार संजयकाका पाटील, विलासराव जगताप, गोपीचंद पडळकर व विक्रमसिंह सावंत हे माजी आमदार जगताप यांच्या घरी एकत्र येत चहापान झाले. यात विविध गप्पाही रंगल्या होत्या. मात्र, या गप्पांचे हे क्षण काही कार्यकर्त्यांनी टिपले व ते सोशल मिडियावर तूफान चर्चेचा विषय ठरले. ‘बघा, नेतेमंडळी एकत्रच असतात, आम्ही मात्र त्यांच्यासाठी भांडत असतो’ असे वाक्येही फोटोसह टाकण्यात आली.त्यामुळे दिवसभर हा फोटोची सोशल मिडियावर फिरत होता.
माडग्याळच्या पाण्याचा श्रेयवाद विकोपाला पोहोचला होता.या वादाचा सोशल मिडियावर अरोपपत्यारोपच्या फिरत होत्या,भाजप-काँग्रेस कार्यकर्ते मिडियावर भिडले होते. त्यामुळे कार्यक्रमात काही अडचणी होतील काय?अशी भिती व्यक्त होत होती. मात्र, झाले तिसरेच माजी आमदार विलासराव जगताप हे भाजप नेते असले तरी त्यांच्याच पक्षाचे खासदार संजय पाटील, विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी जमत नाही,हे वारंवार स्पष्ट झाले आहे. ते माडग्याळला जाण्यापूर्वी पाटील, पडळकर व विक्रमसिंह सावंत थेट विलासराव जगताप यांच्या निवासस्थानी पोहोचले. नाष्टा केला.गप्पा रंगल्या,मात्र कार्यकर्ते आपआपल्या नेत्यांची बाजू मांडतांना झुंज खेळत असताना नेत्यांनी राजकीय वैरत्व बाजुला ठेवून एकत्रित आल्याने अनेकांच्या भूवया उंचविला आहेत.