महिला शिक्षकेला लुटणारे तिघे अटकेत,सव्वा लाखाचा मुद्देमाल ‌जप्त

0
11

दुचाकीवरुन शाळेत निघालेल्या शिक्षिकेला चाकूचा धाकाने लुटत सव्वालाखाचे सोने-चांदीचे दागिणे लुटणाऱ्या तिघां चोरट्यांना मिरज बसस्थानक परिसरात सोमवारी पोलीसांनी अटक केली.या प्रकरणी अक्षय श्रीकांत पाटोळे (रा. डफळापुर) अमोल बाबासाहेब रुपनर (रा. नागज) आणि किसन लक्ष्मण नरळे (रा. घोरपडी) यांना अटक करण्यात आली.

कवटेमहाकांळ तालुक्यातील दीपाली मगर या शिक्षिका कोंगनोळीहून अग्रण धुळगाव शाळेत दुचाकीवरून जात असताना दोन दुचाकीवरुन आलेल्या तरुणांनी अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटले होते. दि. १० ऑक्टोंबर रोजी ही घटना घडली होती.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील कर्मचाऱ्यांना काही व्यक्ती मिरजेत चोरीचे दागिने विकण्यास येत असल्याची माहिती मिळाली. याआधारे मिरज बस स्थानक परिसरात तिघांना संशयावरुन ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे चोरीतील सोन्याचे सव्वालाखाचे दागिने मिळाले.

या प्रकरणातील अक्षय श्रीकांत पाटोळे (रा. डफळापुर) अमोल बाबासाहेब रुपनर (रा. नागज) आणि किसन लक्ष्मण नरळे (रा. घोरपडी) यांना अटक करण्यात आली. त्यांचा मित्र तुषार गायकवाड (रा. नागज) याच्यासह चौंघानी मिळून ऑक्टोबर महिन्यात कोगनोळी ते अग्रणी धुळगाव जाणारे रोडवर स्कुटीवरून जाणाऱ्या शिक्षकेस मोटार सायकली आडव्या मारत त्यांना थांबवून चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here