जत : १९९५ साली जत तालुक्याचा म्हैसाळ योजनेत समावेश करणेत आला. त्यावेळी २२५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन १६ लघु पाटबंधारे तलाव, संख आणि दोड्डनाला माध्यम प्रकल्प भरून देणार परंतु अनुशेष आणि राजकीय अवस्था यामुळे आज ही योजना पूर्ण होऊ शकली नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल.तीन वर्षापासून खासदार संजयकाका पाटील व विलासराव जगताप यांचे माध्यमातून प्रयत्न करून अनेक अडथळे पार करून १७ डिसेंबरला माडग्याळ ओढ्यात पाणी सोडले आहे. दोन पाझर तलाव व १४ सिमेंट बंधारे भरून दोड्ड नाला भरू लागला आहे. त्यामुळे शेतकरी जनावरे यांचा पिण्याचा व शेतीचा प्रश्न काही अंशी मिटला आहे.
आता इथूनच पुढे व्हसपेठ तलाव भरून गुड्डापुर तलावात पाणी सोडले तर संख माध्यम प्रकल्प भरला जाणार आहे. त्यासाठी पाठपुरावा केला.आज या संदर्भात वारणाली येथे खासदार संजयकाका पाटील व माजी आमदार विलासराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली.जत तालुक्यात सद्या ३७ गावांना ४० टँकर द्वारे पिण्याचे पाणी पुरवले जाते संख, अंकलगी,गुड्डापुर, व्हस्पेठ इ तलाव भरलेस येथील पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.तरी यसाठी खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून या भागाला न्याय द्यावा अशी मागणी जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे यांनी केली.
तसेच विलासराव जगताप यांनी विस्तारित योजनेबद्दल सविस्तर माहिती घेतली.यावेळी माडग्याळ, व्हस्पेठ,गुड्डापूर, आसंगी,गोंधळेवाडी,अंकलगी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे,कार्यकारी अभियंता,उपअभियंता खरमाटे,कार्यकारी अभियंता रोहित कोरे,संचालक विठ्ठल निकम,सोमण्णा हाक्के,सुभाष बसवराज पाटील,साहेबराव टोणे,राजू निळे,माणिक पाटील,तसेच माजी प.स.सदस्य रमाण्णा जीवनावर,शिवप्पा तावशी,आर.एस. पाटील,बसवराज धोडमळ,उपसरपंच बसगोंडा जबगोंड,गुरुबसू कायपुरे ,राजेंद्र हालकुडे उपस्थित होते.