या नेत्यांने केली उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
जत: जत तालुक्याच्या पूर्व भागात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्व भागातील तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडावे, अशी मागणी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आज मुंबई मंत्रालय येथे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांची भेट घेतली. जत तालुक्यातील तलाव म्हैसाळ योजनेअंतर्गत भरण्याबाबतचे पत्र दिले.
जत तालुक्यातील अंकलगी, कोळगिरी, गुड्डापूर, मुचंडी, रावळगुंडवाडी, सालेकीरी, शेड्याळ, वळसंग, अमृतवाडी येथील पाटबंधारे तलाव व पाझर तलावात पाणी सोडल्याची मागणी केली.
तम्मनगौडा रवीपाटील यांनी जलसंपदा विभागाकडे पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विनंती केली आहे.