तम्मनगौडा रवीपाटील यांच्यामुळे जतला २ कोटींचा निधी

0
12

जत: भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी जत शहरातील विविध कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा करून सुमारे दोन कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे
जत तालुक्यातील भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा समितीचे संचालक तमनगवडा रवी पाटील यांनी जत शहरातील विविध विकास कामांना निधी मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

त्यानुसार जत शहराला नगर विकास मंत्रालयाकडून दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
विशेष निधीमधून जत येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सुशोभिकरण करणे: ४५,००; जत येथील पत्रकारनगर येथे पत्रकार भवन बांधणे: २५,०० लाख निधी मंजूर केला आहे.

विशेष रस्ते अनुदानामधून विद्यानगर अंतर्गत डांबरीकरण व गटार करणे:३५ लाख ; प्रभाग क्र.८ मध्ये ट्रिमिक्स करणे:४५ लाख ;  ईदगाह मैदान येथे ट्रिमिक्स करणे:२० लाख ; राजेबस्कर ते ओढापात्रापर्यंत गटार करणे: ३० लाख. असा एकूण २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here