भांडण – तंटा आणि तणावातून सुटण्यासाठी अनेकजण वेगवेगळे अपायकारक मार्ग निवडत असतात. खुप काही मार्ग मनाला समाधान देणारेही असतात. मार्ग चांगला निवडायचा की अपायकारक हे ज्याच्या त्याच्या हितावर किंवा मनावर अवलंबून आहे, तणावमुक्त होण्यासाठी अनेकजण वाईट मार्ग निवडतात. जुगार, अमली पदार्थांची चवीने चव घेतात. पुरुषांना असे मार्ग खूप आवडतात आणि व्यसनही पुरुषांमध्ये खुप आढळते. कुठलाही वाढदिवस, समारंभ असो की लग्न किंवा हळद ते साजरं करण राहतं बाजूला तर मित्राने पहिली मद्यपानाची जागा कुठे केलीय का ते शोधत असतात. असे खुप उत्सव आहेत, सण आहेत ते आपल्यात आनंदाला भर आणत असतात. अगदी त्याचमाणे काही दु:खद घटनाही असतात.
कुणाची आर्थिक खर्चाची अडचण, अकस्मित निधन, कुणाची भांडण – तंटा, दिवस खराब गेला असे प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात. दिवस आनंदात घालवायचा की दुःखात हे सर्व व्यसन धारकांना दिसून येत नाही. आनंद आणि दुःख हे शब्द मद्यपीना अतिशय सारखे झाले आहेत. आनंद झाला की एक ग्लास आणि दुःख झालं की एक ग्लास यात काहीही फरकचं नाही उरला आणि दुःख कमी करण्यासाठी हे घेतल्याशिवाय तणावमुक्त होऊ शकत नाही असे मद्यपिंना वाटते. दुःख कमी करायचा हाच एक उपाय आहे असे सर्वांना वाटते. हयाने आनंद दुपटीने वाढतो आणि दुःख विसरून नवीन आयुष्य सुरुवात होते असे वाटते. शनिवार, रविवार आणि त्यात आणखी मिळून रजा आली की पिकनिकला सुरुवात मगं मद्यपींची मजाचं ! गटारी अमावस्या, ३१ डिसेंबर हे त्यांचे आवडते सण. दारु ही शरीराला हानिकारक आहे. हे माहित असूनसुद्धा आणि आणि दारू पिऊन ती किती कंट्रोल करू शकतो हे दाखवत असतात. यात येणारी भावी पिढी मोठ्यांकडून काय शिकणार ? या व्यसनाने आपले शरिरातील पोट, यकृत, जठर, मंदू, स्नायू, रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो.
भारत आपला कृषिप्रधान देश आहे, हे असतानासुद्धा किटकनाशके जेवढी मिळतात त्यापेक्षा अल्कोहोल ब्रँड बाजारात जास्त प्रमाणात दिसतात. मद्यपान करून घरात भांडण्याचे प्रमाण कुटुंबामध्ये वाढलेला दिसतो. घरगुती हिंसाचार वाढते जाते. तंबाखु हे एक व्यसन बऱ्यांच लोकांना जडलेले आहे. तंबाखूने जबड्याचा, तोंडाचा, फुप्फुसाचा, किडनीचा कर्करोग होऊ शकतो.एखादया व्यक्तीला तंबाखू अथवा दारू मिळाली नाही किंवा इतर व्यसनही मिळाली नाहीतर व्यसनाधीन व्यक्ती मानसिक तणावात जाऊ शकते. अशाने चिंता वाढते, चिडचिड वाढते, बहुधा कुटुंबात क्लेश निर्माण होतो. व्यसनात बराच पैसाही जातो. व्यसनाच्या आधीन जाण्यापेक्षा त्या तणावाचा सामना कसे करायचे हे ठरविले पाहिजे. तरुणांना व्यसन आणि दुष्परिणाम यावर विविध मार्गदर्शन आणि जागरुकता निर्माण करायला हवी. व्यसनमुक्ती आणि पुनवर्सन केंद्र शासनाने लवकरात लवकर उभारायला हवी. जर शासन याकडे दुर्लक्षित करीत असेल. तर पुढची पिढी भारताला खोळंबून टाकणारी एक वाढती समस्या उगम पावेल यात शंकाच नाही. व्यसनमुक्ती कसे करायचे यावर प्रत्येकाच्या मुखात चर्चा होत राहिली पाहिजे. आजही नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य ही संस्था यावर अनेक तरुणांना, पुरुषांना विविध प्रकारे मार्गदर्शन करीत आले आहेत. अशा प्रकारे जानेवारीच्या या शुभमुहुर्तावर नवीन वर्षाची सुरुवात करुन व्यसनाअधीन न जाता व्यसनमुक्तीकडे वाटचाल करू.
निलेश चव्हाण
डोंबिवली
9307271331