अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वाधार’ योजनेचा लाभ घ्यावा : अमोल वेटम

0
21

सांगली : राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या व्यावसायिक, बिगर व्याबसायिक महाविदयालयाची संख्या आणि तेथे प्रवेश घेणा-या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील मागासवर्गीय विदयार्थ्यांची वाढत असलेली संख्या यामुळे सर्वच विदयार्थ्यांना शासकिय वसतिगृह सुविधेचा जागेची मर्यादा लक्षात घेता त्यांना वसतिगृह प्रवेश देणे शक्य होत नाही. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २०१८ च्या शासन निर्णयान्वये व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विदयार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व निर्वाह भत्ता तसेच इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी योजनेच्या लाभाची रक्कम विदयार्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यावर थेट जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

तदनुषंगाने,  या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी दि. १५ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज हे महाविद्यालय मार्फत सहायक आयुक्त समाज कल्याण विभागास सादर करणेबाबत सूचना शासनाने केलेल्या आहेत . या नुसार सर्व विद्यार्थ्यांनी तत्काळ  महाविद्यालयकडे  विहित नमुन्यात अर्ज करून पूर्तता करावी. जर काही महाविद्यालय फॉर्म भरून घेण्यास अडचणी निर्माण करत असतील तर त्यांची तक्रार समाज कल्याण विभागास करावे असे आव्हान रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी केले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here