उमदीतील पडणूरे कुटुंबास उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशनकडून आर्थिक मदत

0
16

जत : जत तालुक्यातील गोरगरीब,निराधार, वेगवेगळ्या समाज्यातील कुटुंबावर नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणामुळे ओढवलेल्या संकटातून सावरण्यासाठी, त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी “एक हात मदतीचा ” म्हणून जत तालुक्याचे कालकथित माजी आमदार श्री.उमाजीराव सनमडीकर काकांच्या स्मरणार्थ श्री.उमाजीराव सनमडिकर मेडिकल फाउंडेशन जत,च्या वतीने,’सामाजिक कृतज्ञता निधी ‘म्हणून रोख रक्कम देण्याची सुरुवात केली आहे.

 

11 जानेवारीला उमदीतील शेतकरी नागप्पा मदगोंडा पडणूरे यांनी कर्जास कंटाळून आत्महत्या केली होती.त्यांच्या कुटूंबाला आर्थिक पाठबळ म्हणून संस्थेचे चेअरमन डॉ.सौ.वैशाली सनमडीकर आणि संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर यांच्या सहकार्याने रोख रक्कम स्वरूपात मदत करण्यात आली.यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते वाहब मुल्ला,डॉ.लोणी,ग्रामपंचायत सदस्य सुरेश हळके मुख्याध्यापक श्री.पाटील सर, श्री. बंडगर सर उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here