आग विझवण्याच्या प्रयत्नात भाजून शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. रावसाहेब बाळू चौंडाज (वय 75) असे मृताचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रावसाहेब चोंडाज हे काल, गुरुवारी (दि.२९) सकाळी शेतात गेले होते. शेतातील पालापाचोळा, गवत एकत्रित करून पेटवले.
यावेळी वाऱ्याने आग शेजारील शेतकरी अभिजित चौंडाज यांचे ऊस तोडलेल्या पालापाचोळ्यास लागली. ती आग विझवण्याचा प्रयत्न करीत असताना त्यामध्ये रावसाहेब चौंडाज यांचा भाजून गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.




