सांंगली : दुष्काळी स्थिती असल्याने सांगलीला हक्काचे आणि नियमित पाणी मिळावे या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. माजी राज्यमंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जयश्री पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील काही तालुययाना हक्काचे पाणी मिळण्यासाठी आमदार डॉ.कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या मोर्चाच्या माध्यमातून म्हैसाळ, आरफळ, टेंभू व ताकारी पाणी योजनांचे उन्हाळी आवर्तन सुरू करुन त्यात सातत्य ठेवावे. चालू लोकसंख्या गृहीत धरून जिल्ह्यात दुष्काळी भागात मुबलक पाणी पुरवठा आवश्यक तेवढ्या टँकरद्वारे करावा. ढाणेवाडीची पाणी पुरवठा योजना व शेतीसाठी पाणी पुरवठा करावा. पलूस तालुययात कृष्णा कालव्याचे आवर्तन सुरू करणे व आरफळ योजनेतून तात्काळ पाणी मिळावे तसेच जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ व जेथे चारा टंचाई निर्माण झाली आहे अशा ठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात.
म्हैसाळ योजनेचे आवर्तन बिनशर्त ठेवावे, विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम युध्दपातळीवर पूर्ण करावे, सांगली महापालिका क्षेत्रात शुध्द व मुबलक पाणी पुरवठा करावा, कृष्णा नदी पावसाळ्यापर्यंत वहाती ठेवावी व पाणी उपसा बंदी लागू करु नये अशा अनेक मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या.
हक्काचे पाणी मिळण्यासाठी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या धडक मोर्चात सहभागी होत याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ येथे सध्याच्या घडीला चारा छावण्या सुरु होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील म्हैसाळ, आरफळ, टेंभू, ताकारी या पाणी योजनांचे उन्हाळी आवर्तन सातत्याने सुरु ठेवावे आणि महत्त्वाचे म्हणजे म्हैसाळ योजनेचे आवर्तन बिनशर्त सुरु ठेवावे. त्यामुळे शेतकरी बांधवांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे.
याबरोबरच म्हैसाळ योजनेच्या विस्ताराचे काम धीम्या गतीने सुरु असून जत पूर्वभागातील अनेक गावे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे आम्ही केलेल्या मागण्या शासनाने तत्परतेने पूर्ण कराव्यात व जनतेला दिलासा द्यावा.कृष्णा कालव्याला तात्काळ पाणी सुरु करावे, या आणि जनतेच्या इतर न्याय्य हक्कासाठी काँग्रेसतर्फे आज सांगलीमध्ये भव्य धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
मोर्चातील प्रमुख मागण्या –
– कृष्णा कालव्याला तात्काळ पाणी सुरु करावे.
– जत, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी या दुष्काळी तालुक्यामध्ये तातडीने जनावरांच्या चाऱ्याची व पाण्याची सोय करावी.
– जिल्ह्यातील म्हैसाळ, आरफळ, टेंभू, ताकारी पाणी योजनांचे उन्हाळी आवर्तन सातत्याने सुरु ठेवावे.
– दुष्काळी भागात मुबलक पिण्याचे टँकर सुरु करावेत.
– जनावरांना चारा छावण्या / चारा डेपो सुरु करावा.
– म्हैसाळ योजनेचे आवर्तन बिनशर्त सुरु ठेवावे.
– विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे.
– म्हैसाळ योजनेच्या वीज बिलास लागणारा निधी टंचाईमधून भरावा.
– सांगली मनपा क्षेत्रात स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करावा.
– कोयना धरणातून वेळोवेळी पाणी सोडून कृष्णा नदी पावसाळ्यापर्यंत वाहती ठेवावी.
– उपसा बंदी लागू करू नये.
फोटो-
पाण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
चांगला बघून फोटो लावा




