सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळपासून चुरसीने उत्साहात मतदान सुरू झाले आहे.सकाळी मतदान संतगतीने सुरू होते,मात्र साडेनऊ नंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढल्याने मतदान टक्केवारी सरासरी १६.६१ टक्केपर्यंत मतदान झाले.सांगली,मिरजसह ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा दिसून आल्या.
सांगलीत एकूण २० उमेदवार नशीब अजमावत आहेत. सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मतदानाचा उत्साह दिसत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १६.६१ टक्के मतदान झाले होते. सद्या सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.नवमतदारांनी अनेक मतदार केंद्रावर जल्लोषात पहिला मतदानाचा हक्क बजावला.नव्या मतदारांनी मतदानानंतर छायाचित्रे काढून सोशल माध्यमावर प्रसिध्दही केले आहेत. आम्ही मतदान केले, तुम्ही मतदानाचा हक्क बजावा, असा संदेशही तरुण देत होते.त्याचबरोबर अनेक पक्षाचे कार्यकर्तेही मतदान करून घेण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत.प्रशासनाकडून अनेक उपाय योजना केल्याने मतदानाचा आकडा वाढणार आहे.