सांगली : सांगली लोकसभा मतदार संघासाठी दुपारी एक वाजेपर्यत २९.६५ टक्के मतदान झाले असून भर उन्हातही मतदारांचा उत्साह कायम आहे.
जत,आटपाडी,कवटेमहकांळ, विटा आदी भागात उन्हाचा तडाखा तीव्र असतानाही अनेक मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत.सकाळपासून उत्साह कायम दिसत आहे.सकाळच्या टप्यात सांगली व मिरज या शहरी भागात मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येत आहे.
दुपारी एक वाजेपर्यत जत २९.५५,खानापूर २७.८४ मिरज ३१.७०,पलूस कडेगाव २६.८०,सांगली ३२.८६,तासगाव-कवटेमहाकांळ २८.५४ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.