ऐतिहासिक हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले व श्री.सदानंदाची पांढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेंळूखी ता.जत येथील श्री.सदानंद देवाचा ऊरूस सालाबादप्रमाणे यंदा मंगळवार ता.७ पासून सुरू झाला आहे. ता.७ ला गंधरात्र व रात्री करमणूकीचा कार्यक्रम संपन्न झाला.आज बुधवार ता.८ ला बकरी,रात्री लोकनाट्य तमाशा,ता.९ ला मुख्य दिवस,महाप्रसाद,कुस्त्या असे कार्यक्रम होणार आहेत.बेंळूखीच्या गावालगत ओढापात्राच्या कडेला श्री सदानंद देवाचे मंदिर(दर्गा) आहे.मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे.दर्ग्यासमोर मोकळे मैदान,वड,चिंच,लिंबासह विविध झाडे आहेत.बाजूलाच ओढापात्र सध्या म्हैसाळ योजनेचे पाणी आल्याने भरलेले आहे.दर्ग्यालगत जूनी विहिर आहे.सध्या कचऱ्या पडल्याने तिचे आस्तित्व धोक्यात आहे.
नवसाला पावणारा सदानंद म्हणून लौकिक आहे.गावातील भारतभर नोकरी,कामानिमित्त असणारे प्रत्येकजण ऊरूसासाठी गावात येतात.बुवानंद,सदानंद, गायकवडसाब,साकलीसुलतान अशी भांवडांची मंदिरे(दर्गा) परिसरातील डफळापूर बाज गावात वसले आहेत.या चारी पीराच्या पांढऱ्या म्हणून गावे प्रसिद्ध आहेत.येथे प्रत्येकाला न्याय मिळतोय असा इतिहास आहे.बेंळूखीकर ऊरूस गुण्यागोविंदांने साजरा करतात.
असलेले व श्री.सदानंदाची पांढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेंळूखी ता.जत येथील श्री.सदानंद देवाचा ऊरूस सालाबादप्रमाणे यंदा मंगळवार ता.७ पासून सुरू झाला आहे. ता.७ ला गंधरात्र व रात्री करमणूकीचा कार्यक्रम संपन्न झाला.आज बुधवार ता.८ ला बकरी,रात्री लोकनाट्य तमाशा,ता.९ ला मुख्य दिवस,महाप्रसाद,कुस्त्या असे कार्यक्रम होणार आहेत.बेंळूखीच्या गावालगत ओढापात्राच्या कडेला श्री सदानंद देवाचे मंदिर(दर्गा) आहे.
मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे.दर्ग्यासमोर मोकळे मैदान,वड,चिंच,लिंबासह विविध झाडे आहेत.बाजूलाच ओढापात्र सध्या म्हैसाळ योजनेचे पाणी आल्याने भरलेले आहे.दर्ग्यालगत जूनी विहिर आहे.सध्या कचऱ्या पडल्याने तिचे आस्तित्व धोक्यात आहे.नवसाला पावणारा सदानंद म्हणून लौकिक आहे.गावातील भारतभर नोकरी,कामानिमित्त असणारे प्रत्येकजण ऊरूसासाठी गावात येतात.
बुवानंद,सदानंद, गायकवडसाब,साकलीसुलतान अशी भांवडांची मंदिरे(दर्गा) परिसरातील डफळापूर बाज गावात वसले आहेत.या चारी पीराच्या पांढऱ्या म्हणून गावे प्रसिद्ध आहेत.येथे प्रत्येकाला न्याय मिळतोय असा इतिहास आहे.बेंळूखीकर ऊरूस गुण्यागोविंदांने साजरा करतात.