माणिक वाघमारे कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक | जत तालुक्यातील भुमिपुत्राची गरूडभरारी…

0
जत : एका छोट्या खेड्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कोल्हापूर क्रीडा विभागाचा उपसंचालक झाला. माणिक वाघमारे यांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी व थक्क करणारा आहे. आम्हा सर्व वाघमारे परिवाराची नव्हे तर संपूर्ण जत तालुक्याची मान अभिमानाने उंच झाली आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या माणिक यांना लहानपणापासूनच खेळाची आवड आहे.  आमचे नाना (तम्मा वाघमारे ) मूळचे जत तालुक्यातील बागेवाडीचे नंतर ते रामपूर  येथील रहिवासी झाले. नाना-काकूंच्या कष्टाचं माणिकनं सोनं केलं. हीरे, माणिकही त्यांच्या कर्तृत्वासमोर फिके पडावेत, असे असामान्य कार्य त्यांनी केले आहे.

 

 

एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला खेळाडू, क्रीडा शिक्षक, जिल्हा क्रीडा अधिकारी ते उपसंचालक असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. क्रीडा क्षेत्रातील त्यांची गरूड भरारी कौतुकास्पद आहे.माणिक वाघमारे यांच्या कारकिर्दीची सुरुवात क्रीडा शिक्षक म्हणून झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी या पदावर प्रथम नियुक्ती ऑक्टोबर 2012 ला गडचिरोली येथे झाली. 2012 ते 2015 दरम्यान गडचिरोली येथे उत्कृष्ट कार्य केले.
2015 ते 2018 या कालावधीमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी, कोल्हापूर व 2018 ते 2023 या कालावधीमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली येथे कौतुकास्पद कामगिरी केली आहे.आता त्यांची कोल्हापूर क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या उपसंचालक या अत्यंत सन्मानाच्या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.