फडणवीस यांच्याकडे आ.पडळकरांची तक्रार | जत विधानसभेतबाबत तम्मनगौडा रवीपाटील यांची महत्त्वपूर्ण भेट

0
19
जत: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जत भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी मुंबईत भेट घेतली.आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात रवीपाटील यांनी तक्रार केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते.

 

सध्या जत तालुक्यात विधानसभा उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापले आहे.आमदार पडळकर हे जतमधून इच्छुक असून त्यांनी स्वतंत्र गट बांधणी सुरू केली आहे.भाजपचे जत विधानसभेचे प्रबळ दावेदार असलेले तम्मनगौडा रवीपाटील यांनी या पार्श्वभूमीवर थेट मुंबई गाठली असून राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. आ.पडळकर यांच्याविरोधात तक्रार केली. पडळकर जत तालुक्यात भाजपचे दुसरे कार्यालय सुरू करण्याच्या प्रयत्नात असून पक्षात दुफळी निर्माण केली आहे.जतमध्ये भूमिपुत्राला उमेदवारी मिळाली पाहिजे. बाहेरच्या उमेदवाराला आमचा ठाम विरोध असल्याचे सांगितले.
जत तालुक्यातील दुष्काळ, पाणी व चारा टंचाई, डोंगरी गावांचे प्रश्न, विस्तारित म्हैसाळ योजनेची कामांच्या बाबत उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले. जाडरबोबलाद प्राथमिक आरोग्य केंद्र व बालगाव येथील बेदाणा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली.पत्रकारांशी दूरध्वनीवरून बोलताना तम्मनगौडा रवीपाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जतच्या विविध प्रश्नावर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.जतकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. वार रूम हेच भाजपचे अधिकृत कार्यालय असेल अन्य कोणी कार्यालय काढून पक्षात फूट पडण्याचा प्रयत्न करू नये. असे कोणी केलास त्याचा पक्ष योग्य तो बंदोबस्त करेल, असे फडणवीस यांनी सांगितले असल्याचे तम्मनगौडा रवीपाटील म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जत तालुक्यातील विविध मागण्याचे निवेदन रवीपाटील यांनी दिले.आ.पडळकर यांची तक्रार फडणवीस यांच्याकडे केली.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here