जत : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे राजे रामराव महाविद्यालय या जत तालुक्यातील एकमेव अनुदानित महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रवेश सुरू झाले आहेत. यामध्ये कनिष्ठ विभाग कला, वाणिज्य व विज्ञान शाखा, वरिष्ठ विभाग कला, वाणिज्य, विज्ञान व बीसीए यांचा समावेश आहे. याचबरोबर रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सुद्धा प्रवेश सुरू झाले असून जत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश अर्ज योग्य कागदपत्रासह महाविद्यालयामध्ये सादर करावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी केले आहे.
अधिक माहिती सांगताना ते म्हणाले, अवर्षणग्रस्त अशा जत तालुक्यात ज्ञानाची गंगोत्री वाहत राहावी व प्रत्येक घरात ज्ञानाच्या सूर्याचा लख्ख प्रकाश पडावा या उदात्त हेतूने तसेच ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ध्येय उराशी बाळगून शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे व जत संस्थानचे भूतपूर्व नरेश श्रीमंत विजयसिंह राजे डफळे यांनी १९६९ साली महाविद्यालयाची स्थापना केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या महाविद्यालयाची स्थापना झालेली आहे. महाविद्यालयाला खेळाची समृद्ध परंपरा असून याचबरोबर एनसीसी, एनएसएस, व्यवसाय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कमवा व शिका योजना, सुसज्ज ग्रंथालय, मुक्तपीठ व एक तास ग्रंथालयात याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, अभ्यासिका व विविध व्यवसायाभीमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सोय अशा विविध अभ्यासक्रमाव्यतिरिक्त सुविधा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
महाविद्यालयाची खास वैशिष्ट्ये
शिवाजी विद्यापीठ संलग्नित महाविद्यालय,सुसज्ज ICT वर्ग खोल्या व संगणक प्रयोगशाळा भाषा, सामाजिक शास्त्र,विज्ञान व पीएचडी संशोधन प्रयोगशाळा,महिला सक्षमीकरण व रॅगिंग विरोधी विभाग,विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह,स्वतंत्र व अध्यायवत ग्रंथालय
खेळासाठी स्वतंत्र मैदान,इंडोअर स्पोर्ट्स हॉल,कॅन्टीन व शुद्ध पाण्याची सोय,औषधी वनस्पती बगीचा, फुलपाखरू बगीचा, आमराई, कॅक्टस बगीचा, गुलाब फूल बगीचा, नारळ बाग, तुळशी वृंदावन (ऑक्सीजन पार्क) बांबू बगीचा व अमृतवन यासह निसर्गरम्य परिसर
महाराष्ट्र विवेक वाहिनी विभाग
विविध शिष्यवृत्त्या व फी सवलत
गरीब विद्यार्थ्यांना विद्यार्थी सहायता निधी
प्रत्येक विभागामार्फत प्रमाणपत्र अभ्यासक्रम,शिवाजी विद्यापीठ दूर शिक्षण केंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र इत्यादी.
गुणवत्ता,विद्यार्थी विकास हेच आमचे ध्येयशिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्नित महाविद्यालयामध्ये एक उपक्रमशील महाविद्यालय म्हणून परिचित असणाऱ्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित राजे रामराव महाविद्यालयाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. अभ्यासक्रमा बरोबर अभ्यासक्रमा व्यतिरिक्त विविध उपक्रम सातत्याने महाविद्यालय राबवत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये वाढ होत आहे.– प्राचार्य डॉ.सुरेश पाटील