कोकळेत पूर्ववैमनस्यातून खुनीहल्ल्यात एक जण जखमी

0
कोकळे : पूर्ववैमनस्यातून एकावर कुऱ्हाडीने व धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. सुशांत अनिल महाजन (रा. कोकळे) असे जखमीचे नाव असून ही घटना कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे मंगळवारी (ता. ९) रात्री साडेनऊ वाजता ओलेकर मळा येथे घडली. यातील संशयित भीमराव बाळासाहेब ओलेकर, अक्षय बाळासाहेब ओलेकर यांच्यावर कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील संशयित अक्षय ओलेकर यास पोलीसांनी ‌ताब्यात घेतले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.