तब्बल तीन वर्षानी मिरजेचे मशिन हॉस्पिटल होणार सुरू!

0
7
मिरज : मिरजेचे पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले वॉनलेस हॉस्पिटल (मिशन हॉस्पिटल) तब्बल तीन वर्षानी पुन्हा सुरू होत आहे.रुग्ण व नागरिकांकडून त्याचे स्वागत केले जात असून प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर यांच्या पुढाकाराने रविवार दि. १४ जुलै रोजी वॉनलेस हॉस्पिटलमध्ये मोफत हृदयरोग तपासणी शिबिर तसेच ईसीजी, इकोकार्डियोग्राफी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गोरगरीब रुग्णांचा आधार म्हणून एकेकाळी नावलौकिक मिळवलेले हे हॉस्पिटल पुन्हा सुरू होत असल्याने दक्षिण महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची सोय होणार आहे.
मिरजेचे प्रसिद्ध वॉनलेस हॉस्पिटल (मिशन हॅस्पिटल) गेल्या तीन वर्षापासून काही कारणास्तव बंद होते. येथील रूग्णसेवा बंद झाल्याने गोरगरीब रुग्णांना महागड्या हॉस्पिटलशिवाय पर्याय नव्हता. मात्र आता पुन्हा हे हॉस्पिटल रूग्णांच्या सेवेत कार्यरत होत आहे. मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर यांच्या आर्थन हार्टकेअर आणि वॉनलेस हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १४ जुलै रोजी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर तसेच ईसीजी, इकोकार्डियोग्राफी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ ते दुपारी अडीचच्या दरम्यान हे शिबिर होणार आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here